पुणे फाल्कन्स संघाचा विजय

By Admin | Updated: May 9, 2017 03:45 IST2017-05-09T03:45:32+5:302017-05-09T03:45:32+5:30

पूनम जगतापच्या अष्टपैलू (नाबाद ९३ व १/७) खेळाच्या जोरावर पुणे फाल्कन्स संघाने तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय

The victory of the Pune Falcons team | पुणे फाल्कन्स संघाचा विजय

पुणे फाल्कन्स संघाचा विजय

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पूनम जगतापच्या अष्टपैलू (नाबाद ९३ व १/७) खेळाच्या जोरावर पुणे फाल्कन्स संघाने तिसऱ्या आबेदा इनामदार अखिल भारतीय निमंत्रित महिलांच्या टी-२० क्रिकेट स्पर्धेत यजमान आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीवर १८५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
आझम स्पोटर््स अ‍ॅकॅडमीच्या व्ही. एम. गानी स्टेडियमच्या मैदानावर सोमवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना पुणे फाल्कन्स संघाने २० षटकांत ५ बाद २२० धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पुणे फाल्कन्स संघाने आझम स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीचा डाव १४ षटकांतच ३५ धावांत गुंडाळला.
स्पर्धेचे उद््घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सरचिटणीस रियाज बागवान, अ‍ॅकॅडमीचे संचालक प्रा. गुलझार शेख, मजिद सय्यद, सीताराम वरकड आदी उपस्थित होते.
संक्षिप्त धावफलक : पुणे फाल्कन्स : २० षटकांत ५ बाद २२० (मानसी पटवर्धन ६, पूनम जगताप नाबाद ९३, माधुरी आगव १७, उमा नामदास १, केतकी खांडेकर २४, पार्वती बाकळे ११, पूनम खेमनार नाबाद ४३, ऋचिता परदेशी ३-०-१९-१, मृदुला रुद्राक्ष ४-०-३२-१, दर्शना महाडिक ४-०-४७-१,फरहाना शेख ४-०-३९-१, ऋतुजा २-०-४०-०, एल. मुजवार ३-०-३९-१) विजयी विरुद्ध आझम स्पोटर््स अ‍ॅकॅडमी : १४ षटकांत सर्व बाद ३५ (रिदा शेख ५, ऋचिता परदेशी ५, मानसी पटवर्धन ३-१-३-१, पूनम जगताप ३-०-७-१, गौरी नगरकर २-०-३-१, वैष्णवी काळे २-०-९-२, पूनम खेमनार २-०-१०-१, पार्वती बाकळे २-२-०-२);
प्रवरा जेम्स : २० षटकांत ९ बाद ८८ (किरण नवगिरे ५८, श्रुती पाटील १५, प्रतुषा ४-०-१८-३, आकांक्षा कोहली ४-०-९-२, रामेश्वरी गायकवाड ३-१-१०-२) पराभूत विरुद्ध कर्नाटक स्पोटर््स - १०.६ षटकांत ६ बाद ९२ (सुभा सतीश नाबाद ३१, किरण नवगिरे ४-०-३९-३, गायत्री पाटील ३-०-२४-२).

Web Title: The victory of the Pune Falcons team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.