जीर्ण विद्युत तारांचा एक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 04:09 IST2015-07-11T04:09:30+5:302015-07-11T04:09:30+5:30
आलमे (ता. जुन्नर) येथील शेतकरी गाडीवरून जाताना रस्त्यात पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून जागीच ठार झाले. दशरथ लक्ष्मण फोडसे (वय ७२)

जीर्ण विद्युत तारांचा एक बळी
मढ : आलमे (ता. जुन्नर) येथील शेतकरी गाडीवरून जाताना रस्त्यात पडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून जागीच ठार झाले. दशरथ लक्ष्मण फोडसे (वय ७२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी सहा वाजण्याच्यादरम्यान दुचाकीवरून शेतात जात असताना खंजीरवाडी रस्त्यावर अकरा केव्हीच्या डीपीला येणारी मेन लाईनची तार तुटून रात्री रस्त्यावर पडली होती.
महावितरणाच्या गलथान कारभारामुळे व जीर्ण झालेल्या साधनसामग्रीमुळेच फोडसे यांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्वरित दुरुस्ती न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा महादेव फोडसे, परशुराम गोपळे, द्वारकानाथ खुटले, गोविंद घोगरे, बाळासाहेब आहेर, सुभाष फोडसे, रोहिदास शिंदे, बबन खुटले, विठ्ठल शिंदे, किसन हुळवळे, राजेंद्र फोडसे, सोपान फोडसे, रवींद्र शिंदे, सुरेश आहेर यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे. सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर व पोलीस कॉन्स्टेबल के. एच. साबळे पुढील तपास करीत आहेत.