पिंपरी येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST2021-06-28T04:08:18+5:302021-06-28T04:08:18+5:30

२०१३ सालापासून डॉ. पांडुरंग नाना लोखंडे यांनी उत्कृष्ट सेवा दिली. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना ...

Veterinary officers felicitated at Pimpri | पिंपरी येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

पिंपरी येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार

२०१३ सालापासून डॉ. पांडुरंग नाना लोखंडे यांनी उत्कृष्ट सेवा दिली. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजना तळागाळापर्यंत ग्रामस्थांना पोहोचविण्याचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले. या वेळी श्रीकांत बोडके यांनी डॉ. पांडुरंग नाना लोखंडे व डॉ. अनिल हनुमंत ठवरे यांचा सत्कार सन्मान करून आभार व्यक्त केले. नवनिर्वाचित डॉ. हनुमंत ठवरे यांची नेमणूक झाल्याने नेमणुकीनंतर त्यांचादेखील सन्मान या वेळी करण्यात आला. या कार्यक्रमासाठी पिंपरी बुद्रुक गावचे प्रमुख माजी सरपंच श्रीकांत बोडके, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य संतोष सुतार, पांडूदादा बोडके, चेअरमन सुदर्शन बोडके, इतर ग्रामस्थ चांगदेव बोडके, प्रवीण बोडके, कैलास घाडगे, अनिल गायकवाड, सोमनाथ बोडके, शंकर बोडके, जगुमामा मोहिते आदी या वेळी उपस्थित होते.

पिंपरी बुद्रुक गावच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान करीत असताना माजी सरपंच श्रीकांत बोडके.

२७०६२०२१-बारामती-०१

Web Title: Veterinary officers felicitated at Pimpri