शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हक्काच्या घरासाठी वयोवृद्ध दाम्पत्याचा संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 02:27 IST

रावणगाव (ता.दौंड) येथील वामन व हरूबाई बिबे वृद्ध दाम्पत्य आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणामधील यादीत (दारिद्र्यरेषेखाली) असतानाही शासनाच्या घरकुल योजनेपासून त्यांना कित्येक वर्षांपासून वंचित आहेत.

रावणगाव - रावणगाव (ता.दौंड) येथील वामन व हरूबाई बिबे वृद्ध दाम्पत्य आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणामधील यादीत (दारिद्र्यरेषेखाली) असतानाही शासनाच्या घरकुल योजनेपासून त्यांना कित्येक वर्षांपासून वंचित आहेत.रावणगाव ग्रामपंचायत प्रशासन या वृद्ध दाम्पत्यास घर बांधण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून घरकुल देण्यास टाळाटाळ करीत आहे. वामन कृष्णा बिबे व त्यांची पत्नी हरूबाई आज वयाच्या नव्वदीच्या घरात असताना या वयात त्यांना अशा मोडक्या छपराच्या घरात आपला संसार थाटावा लागत आहे. त्यामुळे ‘कोणी घर देता का घर’ असे म्हणण्याची या वयात त्यांच्यावर वेळ आली आहे. पावसाळा जवळ आला असून पावसाळ्यात त्यांच्या घरात गुडघाभर पाणी साचते आणि तशातच ते राहतात.या बिबे दाम्पत्याचा राज्य शासनाच्या आर्थिक - सामाजिक सर्वेक्षणामधील यादीतील कुटुंबाची नोंदणी झालेली असून याची कोणीही दखल घेत नाही. या वृद्ध दाम्पत्यास गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. बिबे दाम्पत्यास चार मुले होती. त्यापैकी तीन मुले मरण पावली असून एक मुलगा बाहेरगावी राहतो. त्यामुळे त्यांना आता कोणाचाही आधार नाही. परिणामी या वयातही हरूबाई व वामन बिबे हे वृद्ध दाम्पत्य दुसऱ्याच्या शेतात सालकरी म्हणून काम करून आपली उपजीविका करीत आहेत. हे दाम्पत्य वारंवार रावणगाव ग्रामपंचायतीकडे घरकुल मिळावे, म्हणून हेलपाटे मारत आहेत. तरीदेखील त्यांना घरकुलापासून वंचित ठेवले आहे. याबाबत रावणगावचे ग्रामविकास अधिकारी खोमणे म्हणाले, की जागेअभावी या वृद्ध दाम्पत्यास घरकुल देता येत नाही. दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश मोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही....तर आमरण उपोषणास बसणारयाबाबत हरूबाई बिबे म्हणाल्या, की आता पावसाचे दिवस जवळ आलेले असल्यामुळे मला जर शासनाने लवकरात लवकर घरकुल दिले नाही, तर मी येत्या काही दिवसांतच रावणगाव ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषणाला बसणार आहे.

टॅग्स :HomeघरPuneपुणे