वेल्हे आरोग्य मार्गदर्शनासाठी मदत कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:49+5:302021-06-09T04:13:49+5:30
यासाठी रचना संस्थेच्या संचालिका स्वाती चव्हाण, कल्पना घुले यांच्या हा उपक्रम सुरू करण्यात आला. या मदत कक्षामुळे तालुक्यातील लोक ...

वेल्हे आरोग्य मार्गदर्शनासाठी मदत कक्ष सुरू
यासाठी रचना संस्थेच्या संचालिका स्वाती चव्हाण, कल्पना घुले यांच्या हा उपक्रम सुरू करण्यात आला. या मदत कक्षामुळे तालुक्यातील लोक आणि आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये आरोग्य संवाद साधण्यास मदत होणार असल्याची माहिती, रचना संस्थेचे समन्वयक श्रीपाद कोंडे यांनी दिली. मदत कक्षाद्वारे कोविड रुग्णांसाठी व बालकांसाठी दक्षेतेचे उपाय, गृहविलगीकरणातील रुग्णांची काळजी, कोविड लसीकरण, बालकांचे पोषण, गरज असल्यास ऑक्सिजन बेडची उपलब्धी यांची माहिती देण्यात येणार आहे. इतर आजारांवरील रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना, तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, जननी सुरक्षा योजना आदी योजनांबद्दल रुग्णांना सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
याबाबत ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे वृषाली मोरे व प्राथमिक आरोग्य केंद्र करंजावणे येथे शीतल चोरघे, राजेंद्र रणखांबे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
--
फोटो क्रमांक : ०८ वेल्हे आरोग्य मार्गदर्शन केंद्र
फोटोसाठी ओळ : प्राथमिक आरोग्य केंद्र करंजावणे (ता. वेल्हे) येथे आलेल्या रुग्णांना मदत कक्षाद्वारे मार्गदर्शन करताना शीतल चोरगे.