टोळक्याकडून महंमदवाडी परिसरात वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:18 IST2021-02-06T04:18:26+5:302021-02-06T04:18:26+5:30

पुणे : वानवडीतील महंमदवाडी परिसरात तीन मोटारी, दोन टेम्पोंसह दुचाकींची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून ...

Vehicles vandalized by mob in Mahammadwadi area | टोळक्याकडून महंमदवाडी परिसरात वाहनांची तोडफोड

टोळक्याकडून महंमदवाडी परिसरात वाहनांची तोडफोड

पुणे : वानवडीतील महंमदवाडी परिसरात तीन मोटारी, दोन टेम्पोंसह दुचाकींची तोडफोड केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी गुन्हे शाखेकडून चौघांना अटक करण्यात आली.

अझर रौफ शेख (वय २१, रा. हांडेवाडी, हडपसर), कैफ मोहसीन शेख (वय १९, रा. सय्यदनगर, वानवडी), राहील सादिक शेख (वय २२, रा. लोहियानगर, हडपसर), अक्षय ज्ञानेश्वर जगताप (वय २२, रा. हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काही दिवसांपूर्वी आरोपींची सय्यदनगर भागातील एका रिक्षाचालकाशी भांडणे झाली होती. महंमदवाडीतील ससाणे वस्ती परिसरात असलेल्या एका गल्लीत रिक्षाचालक पळाला होता. त्यानंतर मध्यरात्री आरोपी शेख, जगताप ससाणेवस्ती परिसरात आले. त्यांनी या भागात दहशत निर्माण करून शिवीगाळ केली. या परिसरातील तीन मोटारी, दोन टेम्पो, तीन दुचाकींची तोडफोड करून आरोपी पसार झाले.

गुन्हे शाखेच्या युनिट ५ कडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान चौघांना पकडण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Vehicles vandalized by mob in Mahammadwadi area