शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

येरवड्यात सशस्त्र टोळ्यांकडून वाहनांची तोडफोड, दोन तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:14 AM

फुलेनगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमी केले. या घटनेत ७ ते ८ वाहनांचे नुकसान ...

फुलेनगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमी केले. या घटनेत ७ ते ८ वाहनांचे नुकसान झाले आहे. हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व दगडाच्या साह्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवली. अनेक दोन तरुण या घटनेत जखमी झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. जखमी तरुणांना उपचारासाठी येरवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

फुलेनगर सोसायटी परिसरातील हनुमान मंदिर, महात्मा फुले उद्यान तसेच आळंदी रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची टोळक्याने मोडतोड केली आहे. याच परिसरात दारू, गांजा पिण्यासाठी बाहेरून मुले येत असतात. निर्मनुष्य ठिकाणी ही मुले दारू, गांजा पिऊन गोंधळ घालत असतात. दोन दिवसांपूर्वी या परिसरात काही मुलांचा वाद झाला होता. त्यातूनच रविवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास या टोळक्याने वाहनांची मोडतोड करीत दोन तरुण गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे फुलेनगर व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. सशस्त्र टोळक्याने दोन ठिकाणी केलेल्या तोडफोडीच्या घटनेमुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.