दहशतीसाठी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:32 IST2020-12-04T04:32:06+5:302020-12-04T04:32:06+5:30

पुणे : अप्पर इंदिरानगर परिसरात टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी हातात शस्त्र फिरवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा ते सात ...

Vehicle vandalism by mob for terror | दहशतीसाठी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

दहशतीसाठी टोळक्याकडून वाहनांची तोडफोड

पुणे : अप्पर इंदिरानगर परिसरात टोळक्याने दहशत निर्माण करण्यासाठी हातात शस्त्र फिरवत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी रात्री घडली असून एकाला अटक केल्याच्या रागातून ही तोडफोड केल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे.

विनायक साळवे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर परिसरातील महाडीक चाळील गल्लीत साळवे यांनी त्यांची दुचाकी उभी केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास हातात धारदार शस्त्र घेऊन आलेल्या चार जणांनी दुचाकीची मोडतोड केली. तसेच जवळच्या तीन-चार दुचाकी व कारचेही नुकसान केले. त्यानंतर ते चौघेही हातातील शस्त्रांच्या आधारे दहशत पसरवत गेले.

-------------------------------

Web Title: Vehicle vandalism by mob for terror