वाहन चोरणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: December 26, 2016 03:28 IST2016-12-26T03:28:12+5:302016-12-26T03:28:12+5:30

संशयित दुचाकीस्वाराकडे कसून चौकशी केली असता, इतर ठिकाणीही वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले.

Vehicle stealing gang fleece | वाहन चोरणारी टोळी गजाआड

वाहन चोरणारी टोळी गजाआड

चिंचवड : संशयित दुचाकीस्वाराकडे कसून चौकशी केली असता, इतर ठिकाणीही वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले. या चोरट्यांकडून पोलिसांनी दहा वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी केली.
शनिवारी दुपारी चिंचवड पोलीस काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चित्तराव गणपती मंदिर परिसरात वाहन तपासणी करीत असताना नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन दोन जण काळेवाडीकडे जात होते. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतरही त्यांनी दुर्लक्ष करून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. ही बाब दुचाकीस्वाराच्या लक्षात आल्याने त्यांनी मोकळ्या जागेत गाडी लावून जवळच सुरू असलेला क्रिकेट पाहण्याचा बहाणा केला.
वाहनचालक चंद्रकांत राजेंद्र गायकवाड (वय २८, रा. चांडवली,ता. खेड) व मागे बसलेला विठ्ठल अशोक उंबरे (३२, रा. चाकण) येथील असल्याचे समोर आले. (वार्ताहर)

Web Title: Vehicle stealing gang fleece