शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

वाहन विक्री ३६ टक्क्यांनी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:38 AM

वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला सोनेरी झळाळी लाभली नाही. गेल्या तीन वर्षांत यंदा सर्वांत नीचांकी ५ हजार ६२६ विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) झाली आहे.

पुणे : वाहन विक्रीसाठी यंदाच्या दसऱ्याला सोनेरी झळाळी लाभली नाही. गेल्या तीन वर्षांत यंदा सर्वांत नीचांकी ५ हजार ६२६ विक्री झाल्याची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा महसुलात तब्बल सहा कोटी ३१ लाख रुपयांनी घट झाली आहे.दसरा, गुढीपाडवा, दिवाळी पाडवा, अक्षयतृतीया या साडेतीन मुहूर्तादिवशी वाहन, घर, सोनेअथवा एखादी नवीन वस्तू घरी आणली जाते. यंदाही त्याप्रमाणेच नागरिकांनी वाहन खरेदीसाठी रांगा लावल्याचे चित्र होते. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत तब्बल ३६ टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या वर्षी (२०१७) दुचाकी ५ हजार ७४१, चारचाकी २ हजार ७५ आणि वाहतुकीच्या ८७३ गाड्यांचीविक्री झाली होती. त्यापोटी तब्बल २६ कोटी ९६ लाख ४२ हजार ८५६ रुपयांचा महसूल जमा झालाहोता. यंदा त्यात २० कोटी ६५ लाखांपर्यंत घट झाली आहे. म्हणजेच महसुलात चोवीस टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.गेल्या वर्षीपेक्षा दुचाकींची विक्री २९ टक्क्यांनी घटली असून, एकूण ४ हजार ११५ दुचाकी विकल्या गेल्या आहेत. चारचाकी गाडींच्या विक्रीत तब्बल ५४ टक्क्यांनी घट झाली आहे. यंदा अवघ्या ९७० चारचाकी गाड्या विकल्या गेल्या आहेत. वाहतुकीची ५४१ वाहने (३९ टक्के घट) विकली गेली आहेत.सप्टेंबर २०१८ अखेरीस शहरातील वाहनांची संख्या ३७ लाख ६० हजार ७२५ इतकी होती. त्यात दुचाकींची संख्या २७ लाख ९१ हजार ८०८ आणि चारचाकी वाहनांची संख्या ६ लाख ६८ हजार ९१५ इतकी आहे, तर प्रवासी आणि मालवाहतूक करणारी वाहने ३ लाख आहेत.>दसºयाच्या काळातील वाहन विक्रीवाहन प्रकार २०१६ २०१७ २०१८मोटारसायकल ४५४० ५७४१ ४११५चारचाकी १७६० २०७५ ९७०वाहतुकीची वाहने ६१६ ८७३ ५४१महसूल २०,२९,४६,२६१ २६,९६,४२,८५६ २०,६५,०००००