पिकअप टेम्पोने अचानक बे्रक दाबल्याने वाहनांचे नुकसान
By Admin | Updated: November 16, 2016 02:50 IST2016-11-16T02:50:18+5:302016-11-16T02:50:18+5:30
मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत मालवाहतूक पिकअप टेम्पोच्या ड्रायव्हरने अचानक बे्रक दाबल्याने मागील बाजूला मालवाहतूक

पिकअप टेम्पोने अचानक बे्रक दाबल्याने वाहनांचे नुकसान
अवसरी : मंचर-शिरूर रस्त्यावर अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत मालवाहतूक पिकअप टेम्पोच्या ड्रायव्हरने अचानक बे्रक दाबल्याने मागील बाजूला मालवाहतूक तीन चाकी टेम्पो धडकल्याने तीन चाकी वाहनाचे अदाजे ४० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
रविवारी सायंकाळी ५च्या सुमारास अवसरी खुर्द, वायाळमळा हद्दीत मालवाहू पिकअप टेम्पो (एमएच १२ केपी २८८३) मांडवगण फराटा, शिरूर येथून कांदाविक्रीसाठी मंचर कृषी उत्पन्न समितीत विकण्यासाठी चालला होता. वायाळमळा फाट्याजवळ टेम्पो जात असताना त्याला अचानक दोन कुत्री आडवी आल्याने वाहनचालकाने जागेवरच ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या तीन चाकी मालवाहू (एमएच १७-टी ६९०५) वाहनाची टेम्पोला जोरदार धडक बसल्याने तीन चाकी टेम्पोचा पुढील भाग वाकला व काच फुटली. टेम्पोत असलेले ४० किलो गावठी तुपाचे कॅन पलटी होऊन टेम्पोचे व तुपाचे अंदाजे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. तीनचाकी मालवाहतूक करणाऱ्या वाहनाचे चालक भाऊसाहेब शिंदे यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते वाचले. या वेळी वाहनांचा रांगाच रांगा लागल्या होत्या. सारथी डेअरीचे मालक चंद्रकांत वळसे-पाटील निरगुडसर गावाचे माजी उपसरपचं रवींद्र वळसे-पाटील
व स्थानिक रहिवाशांनी
वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. (वार्ताहर)