शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सराफ ५० कोटी खंडणी प्रकरणी वाहनचालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 22:18 IST

जिल्ह्यातील एक 'राजकीय पहिलवान' ५० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

पुणे : पुण्यातील नामवंत सराफाला धमकावून ५० कोटी रुपये मागण्याच्या प्रकरणात त्यांच्या घरातील वाहनचालकाला पोलिसांनी आज अटक केली. संदेश वाडकर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणाची संबंधित शिरुर तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा नेतापैलवान यालाही पोलिसांनी गुरुवारी चौकशीला बोलावले होते. मात्र, आज हा पैलवान चौकशीसाठी आला नसल्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी याअगोदर आशिष हरिश्चंद्र पवार (वय २७, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४५, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय ३२, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत संदेश वाडकर याचा संबंध पुढे आला. संदेश हा त्यांच्या घरातील वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यामुळे त्याचे घरात येणे जाणे होते. या प्रकरणात जे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले होते. तो कॅमेरा संदेश वाडकर याने लपविला होता. त्याला पोलिसांनी आज ताब्यात घेऊन अटक केली.

जिल्ह्यातील एक 'राजकीय पहिलवान' ५० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संबंधित राजकीय पहिलवानाने फिर्यादीला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी त्याच्यासोबत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. 

रुपेश चौधरी हा या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी मुख्य म्होरक्या आहे. त्या राजकीय पहिलवानाने "तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्या वतीने काम पाहील", अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावानेसराफाकडे खंडणीची मागणी करत होता. याप्रकरणी आम्ही संबंधित राजकीय पैलवानाला आज चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, आज तो चौकशीसाठी आला नाही. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक