शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

खडी मशीन चौकात विचित्र अपघातात वाहनाचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 19:57 IST

चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले.

ठळक मुद्देसुदैवाने जीवितहानी नाही , कात्रज बायपासवर लांबच लांब रांगा

कोंढवा :- कोंढवा बुद्रुक येथील खडी मशीन चौकाजवळ झालेल्या विचित्र अपघातात चार वाहनाचे नुकसान झाले आहे.या वाहनातील सर्वांचे दैव बलवत्तर होते. त्यामुळे कोणालाही कसलीही दुखापत झालेली नाही. परंतु, या चार वाहनाचे बरेच नुकसान झाले आहे. मंगळवारी (दि. ७ आॅगस्ट) सकाळी कात्रजकडून खडी मशीन चौकाकडे जात असलेला कंटेनर वाहतूक करणारा ट्रक त्याच्या डाव्या बाजूने जात असलेल्या इनोव्हा क्रिस्टा गाडीला घासून गेला. यात क्रिस्टा गाडीच्या चालकाच्या बाजूचा दरवाज्याचे चांगलेच नुकसान झाले. हे पाहून घाबरलेला ट्रक चालक ट्रक चालू अवस्थेत ठेवून पळून गेला. चालू असलेला ट्रक अचानक पुढे सरकल्याने त्याच्यापुढे असलेल्या चारचाकी वाहनांना जोरात धडकला. ज्यामुळे यातील एक वाहन त्याच्यापुढे असलेल्या वाहनाच्या वर जाऊन अडकले. ट्रकच्या पुढे असलेल्या चार वाहनांना याचा फटका बसला. या चारही वाहनात असलेल्यांना कसलीही गंभीर दुखापत झाली नाही. सुदैवाने ट्रकच्या पुढे दुचाकी वाहन नव्हते, अन्यथा जीवितहानी होण्याची दाट शक्यता होती. यावेळी या अपघातामुळे कात्रज बायपासवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोंढवा वाहतूक शाखेने ही वाहने लवकर बाजूला काढली व वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :KondhvaकोंढवाAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडी