मार्केट यार्डात भाजीपाला, फळे-फुले बाजारात कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:05 IST2020-11-28T04:05:31+5:302020-11-28T04:05:31+5:30
पुणे : केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व कामगार विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी ...

मार्केट यार्डात भाजीपाला, फळे-फुले बाजारात कडकडीत बंद
पुणे : केंद्र सरकारच्या कृषी विधेयक व कामगार विधेयकाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गुरुवारी मार्केट यार्डातील फळे,
भाजीपाला बाजार, फुलबाजार, केळी बाजारात १०० बंद होता, तर गुळ- भुसार विभागातील व्यवहार मात्र सुरु होते. मार्केटयार्डातील सर्व संघटनांच्या वतीने बंद पाळण्यात आल्याची माहिती कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली. गुरुवारी सकाळी बंद दरम्यान मार्केटयार्डातील गेट क्रमांक एक समोर कामगारांनी निदर्शने केली. यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष किसन काळे, सचिव संतोष नांगरे माजी अध्यक्ष संजय साष्टे, भरत शेळके यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दररोज मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, मात्र गुरुवारी बंद असल्यामुळे शुकशुकाट पहायला मिळाला. दररोज
शेतकरी, व्यापारी खरेदीदार, कामगार यांच्यामुळे मार्केटयार्डातील फळे भाजीपाला, कांदा बटाटा, फुल बाजारासह केळी बाजारात कोट्यवधी रुपयांची
उलाढाल होत. बंदामुळे ती ठप्प झाली होती .