भाजीमंडई झाली चकाचक
By Admin | Updated: November 12, 2014 23:12 IST2014-11-12T23:12:51+5:302014-11-12T23:12:51+5:30
बारामती शहरात वाढत्या विषाणुजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता. शहाराच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठय़ा भाजी मंडईमध्ये बुधवारी (दि. 12) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

भाजीमंडई झाली चकाचक
बारामती : बारामती शहरात वाढत्या विषाणुजन्य आजारांचे प्रमाण लक्षात घेता. शहाराच्या मध्यवर्ती भागातील सर्वात मोठय़ा भाजी मंडईमध्ये बुधवारी (दि. 12) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे भाजीमंडई चकाचक झाली आहे. भाजीमंडई बांधल्यापासून प्रथम संपूर्ण भाजी मंडईची स्वच्छता करण्यात आली.
बारामती शहरात सध्या डेंग्यू, गोचीड ताप, मलेरिया या सारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातही शहराला प्रथमच मोठय़ा प्रमाणावर डेंग्यूचा सामना करावा लागत आहे. डेंग्यूमुळे शहरात दोन बळी गेले आहेत. या पाश्र्वभूमीवर नगरपालिकेने शहरात व्यापकप्रमाणात स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणा:या गणोश भाजी मंडईची स्वच्छता करण्यात आली. गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता मोहीम सुरू आहे. स्वच्छता मोहिमेसाठी मंडईतील, गाळ्यांमधील सर्व माल, साहित्य पूर्णपणो बाहेर काढण्यात आला होता.
स्वच्छता मोहीम पूर्ण होईर्पयत भाजीविक्रेते, व्यावसायिकांना या ठिकाणी बसण्यास मनाई करण्यात आली होती. पर्यायी व्यवस्थेद्वारे मंडईलगत विक्रेत्यांची बसण्याची सोय करण्यात आली होती. यामध्ये तीन टेंपो आणि तीन ट्रॉली कचरा बाहेर काढण्यात आला. बारामती शहरात प्रथमच अशी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे भाजीमंडई चकाचक झाली आहे.
यामध्ये नगराध्यक्ष सुभाष सोमाणी, मुख्याधिकारी दीपक ङिांजाड, नगरसेवक बबलू देशमुख, नगरसेवक सुनील सस्ते, बारामती बँकेचे संचालक सचिन सातव, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे, मंडई विभागप्रमुख राजेंद्र सोनवणो, दादा जोगदंड यांच्यासह नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी, भाजी मंडईतील सर्व गाळेधारक यांनी मोहिमेत सहभाग घेतला. नागरिकांनी या मोहिमेचे स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)