सणासुदीमुळे भाज्या, फळे महाग
By Admin | Updated: September 21, 2015 03:58 IST2015-09-21T03:58:26+5:302015-09-21T03:58:26+5:30
मागील आठवड्यात तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि सण-उत्सवामुळे भाज्या व फळे महाग झाली आहेत. मात्र महिनाभरापासून कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत.

सणासुदीमुळे भाज्या, फळे महाग
पिंपरी : मागील आठवड्यात तीन-चार दिवस पडलेल्या पावसामुळे आणि सण-उत्सवामुळे भाज्या व फळे महाग झाली आहेत. मात्र महिनाभरापासून कांद्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. जुन्या कांद्याची विक्री ५५ ते ६०, तर नवीन कांदा ५० रुपये किलो असा दर आहे.
गौरी-गणपतीमुळे सर्वच फळे महागली आहेत. पाच फळांचा वाटा ३० रुपयांना विक्री होत आहे. डाळिंब १०० ते १२० रुपये किलो, तर चिकू ७० रुपये किलोने विक्री सुरू आहे. पेरूस ६० ते ७० रुपये किलो इतका भाव आहे. सीताफळ ७० व संत्रीचे भाव ८० ते ९० रुपये किलोपर्यंत गेले आहेत.
आवक कमी झाल्याने वाटाणा ३० ते ४० रुपयांनी महाग झाला आहे. १०० रुपये किलो असणारा वाटाणा या आठवड्यात १३० ते १४० रुपये किलो आहे. काकडीच्या भावातही १० रुपयांनी वाढ होऊन ३० रुपये किलो विक्री सुरू आहे. भेंडीच्या दरातही किलोमागे १० रुपयांनी वाढ झाली आहे. मागील आठवड्यात १० रुपये किलो असणारे टोमॅटो २० रुपये किलो झाले आहेत. आवक घटल्याने मेथी २०, तर कोथिंबीर दर २० ते २५ रुपये जुडी आहे. इतर पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत.
भाज्यांचे किलोसाठीचे दर (रुपयांत) : कांदा- ६०, बटाटा-१५, आले-५०, लसूण-६० ते ९०, वांगी-२०, टोमॅटो-२०, भेंडी-३०, गवार-३०, पावटा-३०, राजमा-३०, वालवर-४०, वाटाणा-१३० ते १४०, शेवगा-४०, चवळी-४०, घेवडा-५०, कोबी-३०, फ्लॉवर-५० ते ६०, मिरची-३०, ढोबळी मिरची-३०, कारले-४०, दोडका-४०, दुधी भोपळा-२०, डांग्या भोपळा-२०, तोंडली-४०, पडवळ-४०. (प्रतिनिधी)