भाजीविक्री ‘स्वाइप’
By Admin | Updated: November 16, 2016 02:48 IST2016-11-16T02:48:09+5:302016-11-16T02:48:09+5:30
बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला घेण्यासाठी सुट्या पैशांची आवश्यकता असते. मात्र, पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद केल्याने

भाजीविक्री ‘स्वाइप’
पिंपरी : बाजारपेठेत किराणा माल, भाजीपाला घेण्यासाठी सुट्या पैशांची आवश्यकता असते. मात्र, पाचशे आणि हजाराची नोट चलनातून बाद केल्याने सुट्या पैशाविना भाजीखरेदी अवघड झाली आहे. दहा रुपयांची मेथीची भाजी असो किंवा ३० रुपये किलो बटाटे, टॉमेटो असा भाजीपाला खरेदीसाठी आता सुट्या पैशांची गरज भासणार नाही. त्यावर चिंचवड मंडईतील तरुणाने उपाय शोधला असून, डेबिट किंवा क्रेडिट कार्डावर भाजीमाल खरेदी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरुद्ध अभियान छेडले असून, मागील आठवड्यात एका रात्रीत पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्या. त्यामुळे किरकोळ खरेदी करण्यासाठी नागरिकांना चलन उपलब्ध नाही. शंभर-पन्नासच्या नोटा बाजारात उपलब्ध नसल्याने नागरिकांची आर्थिक कोंडी झाली आहे. हातात पाचशे, हजाराची नोट असतानाही केवळ सुटे पैसे नसल्याने भाजी, किराणा मालाची खरेदी करणे अवघड झाले आहे.
या विषयी गरुड म्हणाले, ‘‘भाजीपाला म्हटले, की सुट्या पैशांचा मोठा प्रश्न असतो. कधी-कधी सुट्या पाच रुपयांसाठी ग्राहकांना फिरण्याची वेळ येते. मात्र, डेबिट आणि के्रडिट कार्डाद्वारे स्वाइप करण्याची सोय उपलब्ध करून दिल्याने सुट्या पैशांची चणचण भासणार नाही. सध्या मोठ्या प्रमाणावर सुट्या पैशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंडईतील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. या सेवेसाठी आम्ही कोणताही वेगळा चार्ज आकारत नाही. त्यामुळे जेवढे भाजीपाल्याचे बिल आहे, तेवढेच बिल मशिनच्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार आहे.’’(प्रतिनिधी)