शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आवक वाढल्याने भाज्यांचे भाव गडगडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 01:16 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील बाजारात फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढून भाव गडगडले. तरकारी बाजारात वांगी, टोमॅटो, बीट, कोबी, फ्लॉवर आदी भाज्यांना २ ते ६ रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. मेथीच्या गड्ड्या पडून राहिल्या, तर वांगी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भाज्या मार्केटमध्ये शिल्लक राहिल्या. भाज्यांचे भाव कोसळल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.महाशिवरात्रीला सहा दिवस अवकाश असल्याने आज बाजारात आंध्र प्रदेशातून सोळा टनाचा रताळी घेऊन आलेला ट्रक मागणीअभावी बाजारात उभा राहिला. ट्रक उभा करून त्या व्यापाºयाला उद्या, परवाच्या बाजाराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. येथील बाजारात बटाटा ७०० रुपये, तर कांद्याला १७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. चाकण येथील मार्केट यार्डमधील तरकारी विभागात वातावरणातील बदलामुळे भाज्यांची मोठ्या प्रमाणावर आवक होऊन भाज्यांचे भाव गडगडले. कोबी, फ्लॉवर, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्यांसह मेथीची बाजारात मोठी आवक झाली.>काºहाटी : पालेभाज्यांना भाव मिळत नसल्याने शेतात पिकविलेला माल कोठे विकायचा, याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. मिळेल त्या भावाने शेतमाल विकावा लागत आहे.चार-पाच वर्षांच्या दुष्काळाने होरपळून निघालेल्या भागात यंदा समाधानकारक पाऊस पडला. पाण्याच्या जोरावर शेतकºयाने शेतात जनावरांच्या चाºयाबरोबर पालेभाज्या कांदा, दोडका, मेथी, कोथिंबीर, घेवडा, हिरवी मिरची आदी पिके घेऊन कुटुंबाला आर्थिक मदतीतून बाहेर येण्यासाठी ४ पैसे कसे मिळतील, या आशेने शेतीमाल बाजारपेठेत पाठविल्यानंतर शेतकºयांच्या पदरी खर्चदेखील निघत नसल्याची चित्र आहेत.बहुतांश भागात शेतकरी शेतात पिकवलेला शेतीमाल बारामती, पुणे, हडपसर या भागात विक्रीसाठी घेऊन जातात. सध्या मेथीची पेंढी ३-४ रुपयांना विकली जात आहे. त्यामुळे मिळणाºया पैशामध्ये गाडीचे भाडे, बियाण्यांचा खर्च, औषधफवारणी व मजुरांचा पगार यांचा ताळमेळ काढता शेतकºयाच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही. निवळ बाजारभाव मिळत नसल्याने शेतकºयांपुढे शेतीमाल विकायचा कसा, पैसे कोठून आणायचे, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. ज्या वेळी शेतकºयाकडे कांदा नव्हता, त्या वेळी कांद्याचे दर ७०-८० रुपयांपर्यंत गेले होते. आज शेतकºयाचा माल बाजारात येऊ लागला, तर त्याला १२-१५ रुपये दर मिळायला लागला. २० रुपयांची मेथीची पेंढी आज २-३ रुपयांना विकावी लागत आहे. या बाजारभावाच्या चढउतारांमुळे शेतकºयाचे आर्थिक गणितच विस्कटले असल्याची खंत कºहाटीचे शेतकरी बाळासाहेब वाबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.>भाज्यांना प्रतिकिलोस मिळालेले भाव रुपयांत असे : कोबी - २ ते ३, फ्लॉवर - २ ते ३, टोमॅटो - ४ ते ५, बीट - २ ते ४, दुधी भोपळा - ४ ते ५, वालवर - ६ ते ७, ढोबळी - १० ते १२, काकडी - १० ते १५, गाजर - १२ ते १४, वाटाणा - १५ ते २०.>तेजीत असलेल्या भाज्या रुपयांत अशा : भेंडी - २० ते २५, गवार - २५ ते ३०, शेवगा - ३० ते ३५, हिरवी मिरची - ३० ते ३५.>पालेभाज्यांचेजुडीचे भावरुपयांत असे :शेपू -२, मेथी-३, पालक - २, कोथिंबीर - २.>भाज्यांचे दर सद्य:स्थितीत सर्वसाधारण आहेत. लागवड ही मोठ्या प्रमाणात होत आहे. भविष्यात या भाज्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकºयांनी शास्त्रीय ज्ञानाचा वापर करून उत्पादन खर्च कमीत कमी करून उत्पादन घ्यावे. जेणेकरून भाजीपाला पिके तोट्यात जाणार नाहीत.- राजेंद्र वाघमोडे, कृषितज्ज्ञ