भाजीपाला, फळांच्या दरात घसरण
By Admin | Updated: March 2, 2015 03:18 IST2015-03-02T03:18:13+5:302015-03-02T03:18:13+5:30
मुसळधार अवकाळी पावसाचा जबर फटका भाजीपाला आणि फळे यांना बसला आहे. शनिवारी (दि. २८) झालेल्या या पावसामुळे भाजीपाला

भाजीपाला, फळांच्या दरात घसरण
पुणे : मुसळधार अवकाळी पावसाचा जबर फटका भाजीपाला आणि फळे यांना बसला आहे. शनिवारी (दि. २८) झालेल्या या पावसामुळे भाजीपाला आणि फळांच्या दरामध्ये सरासरी १० ते २० टक्के घसरण झाली.
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड बाजारात रविवारी नेहमीप्रमाणे भाजीपाला, फळे, फुलांची आवक झाली. मात्र, पावसामुळे त्याची पाहिजे तशी खरेदीच झाली नाही. मालाचे ढीग सर्वत्र दिसून येत होते. बहुतेक भाजीपाला आणि फळांच्या दरामध्ये लक्षणीय घट झाली. बटाटा, कांदा, भेंडी, पावटा यांचे दर १० ते २० टक्क्यांनी घसरले.
काकडी, शेवगा, फ्लॉवर, कोबी, वांगी, तोंडली हे मोठ्या प्रमाणात स्वस्त झाले. मागील आठवड्यात काकडीचा १० किलोचा दर २६० ते ३०० रुपये होता. तो आता १२० ते १५० रुपयांवर आला. ८० ते १४० रुपयांवर कोबी ६० ते १२० रुपयांवर घसरला. शेवगा ५००-६०० वरून ४००-४५०, हिरवी कारली ३५०-४०० वरून २५०-३००, वांगी १००-२०० वरून ६०-१४०; तर कळी तोंडली २००-२२० वरून १४०-१५० रुपयांपर्यंत कमी झाली. जवळपास ३० टक्के माल शिल्लक असल्याची माहिती मार्केट यार्डातील अनेक व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात कर्नाटकातून ४ ट्रक कोबी, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून १३ ते १४ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून ५-६ ट्रक टोमॅटो, राजस्थानमधून ७-८ ट्रे गाजरांची आवक झाली. १४-१५ टेम्पो फ्लॉवर, १०-१२ टेम्पो कोबी, २-३ टेम्पो शेवगा, ५-६ टेम्पो पावटा, २०० ट्रक कांदा ३०० गोणी लसूण ७० ट्रक बटाटा बाजारात दाखल झाले.
फळभाज्यांचे दहा किलोचे दर : कांदा : १२०-१५०, बटाटा : ७०-१२०, लसूण २५०-६००, आले : सातारी : ३५०, भेंडी : २५०-३५०, गवार : गावरान : ६००-८०० सुरती : ३००-६००, टोमॅटो : ८०-१२०, दोडका : २५०-३५०, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : ४०-८०, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१५०, कारली : हिरवी : २५०-३००, पांढरी : १८०-२००, पापडी : १४०-१६०, पडवळ : १३०-१५०, फ्लॉवर : ४०-६०, कोबी : ६०-१२०, वांगी : ६०-१४०, डिंगरी : १८०-२००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-२८०, तोंडली : कळी : १४०-१५०, जाड : ७०-८०, शेवगा : ४००-४५०, गाजर : १००-११०, वालवर : १४०-१५०, बीट : ४०-५०, घेवडा : २५०-३००, कोहळा : १२०-१४०, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १४०-१६०, ढेमसे : १८०-२००, मटार : परराज्य २००-२२०, पावटा : २००-२५०, तांबडा भोपळा : ४०-८०, सुरण : १६०-१८०, नारळ : १०००-१२००, मका कणीस : (शेकडा) : २००-३००. (१० किलो) ५०-८०.
पालेभाज्यांचे शेकड्यातील दर : कोथिंबीर २००-६००, मेथी ३००-७००, शेपू ३००-६००, कांदापात ५००-७००, चाकवत २००-३००, करडई ३००-४००, पुदिना १००-२००, अंबाडी ३००-५००, मुळे ५००-८००.