शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वीर-सासवड रस्त्याची झाली दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 01:13 IST

अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ; सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष

परिंचे : वीर-सासवड रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असून अपघातांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.यादववाडी, परिंचे, राऊतवाडी, वीर परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. श्रीक्षेत्र वीर येथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे चुकवताना भाविकांना मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी या रस्त्यावरील अपघाताची संख्या वाढली आहे. मात्र, तरीही गेल्या ४ महिन्यांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवण्याची तसदी घेतली नाही.यादववाडी येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या वर्षी साईडपट्ट्यांवरील पाणी जाण्यासाठी उतार केले जातात तेही करण्यात आले नाहीत. रस्त्यांची दुरवस्था होण्याचे हे प्रमुख कारण असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.बापदेव घाट ते वीर हा चार कोटी रुपयाचा रस्ता मंजूर असून काही ठिकाणचे काम सुरू झालेले नाही. पावसाळा संपताच या रस्त्याचे काम सुरू करणार असून, कांबळवाडी ते वीर हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. परिसरातील खड्डे कामगार पाठवून तातडीने तात्पुरते बुजवण्याचे काम करणार आहे.- दिनेश गायकवाड,अभियंता, पुरंदर शाखा

टॅग्स :Potholeखड्डेPuneपुणे