सासवडला कोरोना पार्श्वभूमीवर वीर गोगादेव निशाण प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:14 IST2021-08-23T04:14:17+5:302021-08-23T04:14:17+5:30
तेरा दिवस चालणाऱ्या या घरगुती उत्सवाची सुरुवात येथील गोगादेव नगरात पारंपरिक धार्मिक विधी, गोगागायन महाआरती, निशाण प्रतिष्ठापनेने करण्यात आली. ...

सासवडला कोरोना पार्श्वभूमीवर वीर गोगादेव निशाण प्रतिष्ठापना
तेरा दिवस चालणाऱ्या या घरगुती उत्सवाची सुरुवात येथील गोगादेव नगरात पारंपरिक धार्मिक विधी, गोगागायन महाआरती, निशाण प्रतिष्ठापनेने करण्यात आली. वस्ताद रोमीन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत वाद्यांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, शंख निनादात गोगादेवांच्या जयजयकारात पाच पाऊली करत हा कार्यक्रम पार पडला. कैलास चव्हाण, विकास राठोड, अनिल राठोड, दीपक चव्हाण, अमित राठोड, अमर राठोड, शाम राठोड, प्रकाश परदेशी, सुमित राठोड, गौरव चव्हाण, वैभव चव्हाण, उल्हास राठोड, ताराचंद सोळंकी आदी गोगादेव भक्तांच्या सहभागाने हा सोहळा नित्यनैमित्तिक पूजाआर्चाने तेरा दिवस चालणार आहे.
———————————————————
फोटो --सासवडला गोगादेव जन्मोत्सवा निमित्त निशाण प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
220821\img-20210822-wa0195-1.jpg
सासवडला करोना पार्श्वभूमीवर वीर गोगादेव निशाण प्रतिष्ठापना