श्रीकृष्ण जन्मसोहळ्याने वीणा सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:23 IST2021-09-02T04:23:44+5:302021-09-02T04:23:44+5:30

पुरंदर तालुक्यातील मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सासवड येथील संत सोपानदेव मंदिराचे विश्वस्त त्रिगुण गोसावी यांच्या ...

Veena week concludes with Shrikrushna's birth ceremony | श्रीकृष्ण जन्मसोहळ्याने वीणा सप्ताहाची सांगता

श्रीकृष्ण जन्मसोहळ्याने वीणा सप्ताहाची सांगता

पुरंदर तालुक्यातील मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. सासवड येथील संत सोपानदेव मंदिराचे विश्वस्त त्रिगुण गोसावी यांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वरमहाराज यांचा जन्मदिन आणि श्री कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारायणपूर येथील मंदिरातही कीर्तन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वनपुरी (ता. पुरंदर) येथे सोमवारपासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात हरिनाम सप्ताह आयोजित केला. यानिमित्त दररोज सकाळी मूर्तींची विधिवत महापूजा केली. तर, रात्री १२ वाजता टाळ- मृदंगाच्या जयघोषात मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर गावातील महिला मंडळाच्या वतीने जन्माचा पाळणा म्हणण्याचा कार्यक्रम झाला.

या वेळी भजनी मंडळाचे प्रमुख हभप सुदाम कुंभारकर, भीमाजी कुंभारकर संभाजी महामुनी, माणिकराव कुंभारकर, तुकाराम महामुनी, नामदेव मगर, वर्षाताई कुंभारकर, सुमन रूढ, संजना कुंभारकर, वंदना महामुनी, बाळासाहेब कुंभारकर, शांताराम मगर, गुलाब कुंभारकर, नाथा बापू कुंभारकर, शिवाजी कुंभारकर, तसेच गावातील ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होते. तसेच मंगळवारी सायंकाळी दहीहंडी फोडून आणि उपस्थितांना लाह्याचा प्रसाद देऊन सोहळ्याची सांगता करण्यात आली.

३१ सासवड

सासवड येथील श्री कृष्णजन्म सोहळ्यात निमित्त उपस्थित भाविक

310821\1716-img-20210831-wa0012.jpg

सासवड श्री कृष्ण जन्म सोहळ्याने वीणा सप्ताहाची सांगता.

Web Title: Veena week concludes with Shrikrushna's birth ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.