शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वेदांतची कलेक्टर होण्याची जिद्द, अंधत्वावर मात करत बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 10:35 IST

दृष्टी अंधत्वावर करत मात सरहद्दच्या वेदांतने बारावीत मिळवले घवघवीत यश. वेदांतची कलेक्टर होण्याची जिद्द...

- पांडुरंग मरगजे  

धनकवडी (पुणे) : अडथळ्यांना शिडी बनवून जो यश मिळवतो तोच खरा यशवंत ठरतो. सरहद्द महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेत दिव्यांग विद्यार्थी वेदांत चक्के याने ८५ टक्के दृष्टी अंधत्वावर मात करत वाणिज्य शाखेतून घवघवीत यश मिळवत ८४% गुण प्राप्त केले असून त्याचे कलेक्टर होण्याचे त्याचे स्वप्न आहे.  

कितीही संकटे असली तरी यशाचे शिखर सर केले जाते. सरहद्द स्कूल मध्ये शिकत असलेल्या वेदांत चक्के या दिव्यांग विद्यार्थ्यांने दाखवून दिले. कलेक्टर व्हायचे या एकाच इराद्याने वेदांतने बारावीच्या परीक्षेत रायटरच्या मदतीने ८४ टक्के गुण मिळवत अपंगत्वावर आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

वेदांतला जन्मतःच दृष्टीदोष होता, उत्तरोत्तर दृष्टीदोष वाढत जाऊन नववी पर्यंत तो ८५ % वर जाऊन पोहोचला. त्याचे प्राथमिक शिक्षण भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये झाले तर बारावी साठी त्याने सरहद्दमध्ये प्रवेश घेतला. दोन्ही डोळ्यांना अंधत्व आल्याने वेदांतला अजिबात वाचता येत नाही, मात्र तल्लख बुद्धिमत्ता असल्यामुळे केवळ ऐकून तो अभ्यास करतो. वेदांतने दहावीच्या परीक्षेतसुद्धा रायटर अर्थात लेखनिकाच्या मदतीने परीक्षा देत ८७ टक्के गुण मिळवले होते.

बारावीच्या परीक्षेमध्ये त्याला सोबतच्या विद्यार्थी मित्रांची चांगली साथ मिळाली. शिक्षक, पालक, विद्यार्थी मित्रांचे सहकार्य आणि कठोर परिश्रमाच्या बळावर आपण हे यश मिळवू शकलो, असे वेदांतने सांगितले. वेदांत म्हणाला, जिद्द, परिश्रम मेहनतीच्या बळावर आपण कोणत्याही अडथळ्यांवर मात करू शकतो. नियमित अभ्यास हाच हमखास यशाचा सिक्रेट फार्मुला असून मला भविष्यात कलेक्टर व्हायचं आहे.

टॅग्स :PuneपुणेHSC Exam Resultबारावी निकाल