ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना वत्सलाबाई पुरस्कार जाहीर

By श्रीकिशन काळे | Published: December 4, 2023 08:10 PM2023-12-04T20:10:02+5:302023-12-04T20:12:43+5:30

१३ ते १७ डिसेंबर दरम्यान होणा-या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार

Vatsalabai Award announced to veteran singer Padma Bhushan Begum Parveen Sultana | ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना वत्सलाबाई पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना वत्सलाबाई पुरस्कार जाहीर

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना जाहीर झाला असल्याची घोषणा मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी केली.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे १३ ते १७ डिसेंबर दरम्यान होणा-या ६९ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात बेगम परवीन सुलताना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही जोशी यांनी संगितले.

महोत्सवात असणा-या चित्रप्रदर्शनाविषयी माहिती देताना प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून ‘स्वरचित्र आदरांजली’ असे त्याचे नाव असेल. यावर्षी पं. कुमार गंधर्व, पं. राम मराठे आणि पं. सी. आर. व्यास या तीन कलाकारांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने प्रदर्शनाचा एक भाग हा त्यांना समर्पित असणार आहे. याबरोबरच सवाई गंधर्व महोत्सवात आपली अवर्णनीय कला सादर करणारे काही कलाकार गेल्या काही वर्षांत कालवश झाले त्यांना समर्पित असा एक भाग असेल. प्रदर्शनाच्या तिसऱ्या भागात भारतरत्न पं भीमसेन जोशी यांचा इतर कलाकारांशी असलेला स्नेह व्यक्त करणारी काही प्रकाशचित्रे व त्याबरोबरच किराणा घराण्याचे महान कलावंत असलेले कलाकारांच्या प्रकाशचित्रांचा समावेश असणार आहे."

Web Title: Vatsalabai Award announced to veteran singer Padma Bhushan Begum Parveen Sultana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.