वरवंड कोरोना हॉटस्पॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:09 IST2021-04-06T04:09:29+5:302021-04-06T04:09:29+5:30

कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. वरवंड गावाबरोबर पडवी,कडेठाण, हे गावे हॉटस्पॉटच्या मार्गावर आहेत. यामुळे प्रशासनाने वेळीच योग्य ...

Varvand Corona Hotspot | वरवंड कोरोना हॉटस्पॉट

वरवंड कोरोना हॉटस्पॉट

कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. वरवंड गावाबरोबर पडवी,कडेठाण, हे गावे हॉटस्पॉटच्या मार्गावर आहेत. यामुळे प्रशासनाने वेळीच योग्य तो उपाययोजना करून दौंड तालुक्यातील गावांची तपासणी होणे गरजेचे आहे. मागील सप्टेंबरमध्ये प्रशासनाला वरवंडकरांनी रॅपिड अँटीजन तपासणी केली. घरोघरी जाऊन तपासणी केली होती. यांमध्ये गावाने पूर्णपणे साथ दिली होती.

मागील वर्षी वरवंड गावामध्ये रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली. २ हजार ९६८ कुटुंबाची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती . यामध्ये शरीराचे तापमान व ऑक्सिजन मशीनद्वारे तपासणी करण्यात आली होती. यामध्ये १५० च्या आसपास, संशयित रुग्ण जागेवरच सापडले होते.

सध्या तालुक्यातील कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे तालुक्यातील सर्व कोविड सेंटर फुल झाले आहे. नुकतेच वरवंड येथे कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे. तरीही नागरिक स्वतःहून तपासणीसाठी येत नसल्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. यामुळे ही रॅपिड अँटीजन तपासणी करण्याची गरज आहे.तसेच वरवंड बरोबर पाटस, यवत, कडेठान, पडवी, केडगाव, पारगाव, अशा मोठ्या गावांमध्ये रॅपिड अँटीजन तपासणी होणे गरजेचे आहे. ज्यांना लक्षणे आहेत अशांनी वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. शिवानी पांचाळ यांनी केले आहे. मागील वर्षी वरवंड गावामध्ये रॅपिड अँटीजन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २ हजार ९६८ कुटुंबांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली होती.यामधे १५० च्या आसपास रुग्ण सापडले होते. जर अशी तपासणी करण्यात आली तर असे संशयित रुग्ण सापडतील ज्या रुग्णांना त्रास होत आहे. त्यांनी तत्काळ आरोग्य केंद्र वरवंड यांच्याशी संपर्क साधावा.

पोलीस पाटील किशोर दिवेकर

Web Title: Varvand Corona Hotspot