शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Pune Rain: थंडी अन् उन्हाळ्याच्यामध्ये वरूणराजाची एन्ट्री! पुण्यात पहाटे पावसाची हजेरी

By श्रीकिशन काळे | Updated: March 1, 2024 09:22 IST

कोरेगाव पार्कला आज सकाळी १.५ मिमी आणि एनडीएला ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे....

पुणे : पुण्यासह राज्यामध्ये अनेक भागात पावसाने हजेरी लावली. एकीकडे थंडी जात नसताना आणि उन्हाळा सुरू होत नसताना मध्येच वरूणराजाने एन्ट्री मारली आहे. पावसाची ही हजेरी आज आणि उद्या  शनिवारी देखील असणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोरेगाव पार्कला आज सकाळी १.५ मिमी आणि एनडीएला ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी राज्यात पावसाचा अंदाज दिला होता. तसेच पुढील दोन दिवस अजून पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. राज्यात काही भागात आज आणि उद्या ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडतील, असा इशारा हवामान विभागाने दिला.

शुक्रवारी म्हणजे आज देखील जळगाव, नाशिक, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील. तर उद्या शनिवारी विदर्भामधील गडचिरोली , गोंदिया, बुलडाणा, भंडारा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.मराठवड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि खान्देशातील धुळे, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल.पुणे शहरात दोन दिवसांपूर्वी किमान तापमानात घट होऊन थंडीचा कडाका जाणवत होता. त्यानंतर ४८ तासांमध्येच किमान तापमानात वाढ झाली आणि उकाडा जाणवू लागला.

गुरूवारी दिवसभर पुणेकरांना उकाड्याने हैराण केले होते. त्यानंतर सायंकाळी वातावरणात बदल झाला आणि  हवेत गारवा आला. शुक्रवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी बरसल्या. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि हवेत गारवा आहे. मार्च महिना सुरू झाला आणि उन्हाळ्याऐवजी पावसाळा सुरू झाला की काय? अशीच भावना पुणेकरांची झाली आहे. 

टॅग्स :RainपाऊसPuneपुणे