वाल्हे येथे विविध उमाजी नाईक जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:15 IST2021-09-08T04:15:00+5:302021-09-08T04:15:00+5:30

वाल्हे येथील आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने मंगळवार राजे उमाजी नाईक यांची जयंती साधेपणात साजरी करण्यात आली. यावेळी ...

Various Umaji Naik Jayanti celebrations at Walhe | वाल्हे येथे विविध उमाजी नाईक जयंती साजरी

वाल्हे येथे विविध उमाजी नाईक जयंती साजरी

वाल्हे येथील आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक मित्र मंडळाच्या वतीने मंगळवार राजे उमाजी नाईक यांची जयंती साधेपणात साजरी करण्यात आली. यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन, पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. दुर्गाडे होते. यावेळी सरपंच अमोल खवले, माजी सरपंच महादेव चव्हाण, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संत्यवान सूर्यवंशी, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले, डॉ.रोहिदास पवार, दिपक कुमठेकर, शांताराम पवार, भालचंद्र भुजबळ, दादाराजे म्हञे आदी मान्यवर उपस्थित होते.त्याच बरोबर महर्षी वाल्मिकी विध्यालयात ही पर्यवेक्षक बाबासाहेब कुंभार व स्कूल कमिटी सदश्य प्रमोद शहा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक मित्र मंडळातील अनिल चव्हाण, नवनाथ चव्हाण, सागर चव्हाण, आकाश चव्हाण, राजेंद्र जाधव, कुमार चव्हाण, सिताराम चव्हाण ,अनिकेत चव्हाण, नितीन चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, विनायक चव्हाण, संदीप चव्हाण, सुनील चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

--

फोटो क्रमांक : ०७वाल्हे उमाजी नाईक जयंती साजरी

फोटोओळ- वाल्हे येथे आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, महादेव चव्हाण,सूर्यकांत भुजबळ आदी

Web Title: Various Umaji Naik Jayanti celebrations at Walhe