वारजेत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:32 IST2021-02-20T04:32:56+5:302021-02-20T04:32:56+5:30

येथील योद्धा जिम व राष्ट्रसेवा समूह यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी वारजे ते लाल महाल ...

Various programs on the occasion of Shiva Jayanti in Warje | वारजेत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

वारजेत शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

येथील योद्धा जिम व राष्ट्रसेवा समूह यांच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी वारजे ते लाल महाल शिवज्योत (मशाल) नेण्यात आली होती. याशिवाय येथे रक्तदान शिबिरात तरुणांनी उत्साहात सहभाग घेतला. सुमारे २०० पेक्षा जास्त रक्तदात्यांना महाराजांची आकर्षक मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. सह्याद्री हॉस्पिटल ब्लड बँकेने नियोजन केले. याशिवाय येथील स्नेहा सोसायटीच्या मैदानावर आगामी ३ दिवस हाफ पिच क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्याची माहिती नीलेश बोडके यांनी दिली. कार्यक्रमास महेश बराटे, संतोष घोसाळे, मनोज बराटे, तुफेल शेख, आलम पठाण, भारत भूषण बराटे, सुधीर मोरे कुणाल दांगट, शेखर दांगट, पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी उपस्थिती लावली. राष्ट्रसेवा समूहाच्या वतीने निलेश बोडके, ओमकार घोडके, निलेश गोगावले, सोमनाथ काळे, सागर गोगावले, हनुमंत पांचाळ, ऋषिराज बोडके व अमित कडू, अजित घोसाळे यांनी आयोजनात सहभाग घेतला.

Web Title: Various programs on the occasion of Shiva Jayanti in Warje