रमजान ईदनिमित्त विश्रांतवाडीत विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:10 IST2021-05-16T04:10:03+5:302021-05-16T04:10:03+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रभाग क्र. दोनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोनवणे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसोबत म्हसोबा ...

Various activities in Vishrantwadi on the occasion of Ramadan | रमजान ईदनिमित्त विश्रांतवाडीत विविध उपक्रम

रमजान ईदनिमित्त विश्रांतवाडीत विविध उपक्रम

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे महत्त्व लक्षात घेऊन प्रभाग क्र. दोनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोनवणे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसोबत म्हसोबा मंदिर, जुना आळंदी रोड येथे वृक्षारोपण केले. या वेळी दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष विशाल साळवे, स्वीकृत सदस्य सागर कांबळे, म्हसोबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन भोसले, भाऊ मोरे, मदन पवार, विशाल जाधव, हृषीकेश चव्हाण, असिफ शेख, रोहित चौरे, साहिल सावंत आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते

निब्बाण एज्युकेशनल अँड सोशल ट्रस्ट पुणेकडून रमजान ईदनिमित्त खाऊवाटप करण्यात आले. स. नं. १५३ जाधवनगर वसाहतीतील सर्व॔ लहान मुला-मुलींना सामाजिक कार्यकर्ते रवी साळवे, सागर वानखेडे, सनी कसोटे, फिरोज खान यांच्या हस्ते खाऊ वाटण्यात आला. काय॔क्रमाचे आयोजन भदंत बुद्धघोष थेरो आणि भदंत यश यांनी केले होते.

Web Title: Various activities in Vishrantwadi on the occasion of Ramadan