वाहतुकी सुरक्षा नियमांसाठी हवेलीत विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:31 IST2020-12-04T04:31:00+5:302020-12-04T04:31:00+5:30
पुणे सोलापूर महामार्गावर वाढते अपघात पाहता महामार्ग पोलीस व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यांनी वाहतूक सुरक्षा ...

वाहतुकी सुरक्षा नियमांसाठी हवेलीत विविध उपक्रम
पुणे सोलापूर महामार्गावर वाढते अपघात पाहता महामार्ग पोलीस व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हवेली तालुका यांनी वाहतूक सुरक्षा अभियान राबविण्यासाठी प्रयन्त सुरू केले आहेत. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) महाराष्ट्र राज्य भुषणकुमार उपाध्याय आणि पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, पुणे प्रादेशीक विभाग संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस बारामती फाटाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज नांदरे व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे हवेली तालुका पदाधिकाऱ्यांनी पुणे-सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, सोरतापवाडी, उरुळी कांचन, बोरी भडक, सहजपुर, कासुरडी याठिकाणी जाऊन तेथील प्रशासक, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील अशा लोकप्रतिनिधीची भेट घेऊन वाहूतुक सुरक्षा संदर्भात आपापल्या गावात कश्या उपाययोजना राबविण्यात येतील याबाबत चर्चा करण्यात आल्या.
यामध्ये प्रामुख्याने पुणे सोलापूर महामार्गालगत असणाऱ्या गावांमधून महामार्गावर जोडणाऱ्या रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गतिरोधक बनविणे तसेच वाहतुकीचे नियम दर्शविण्यारे फ्लेक्स लावणे याबाबत काम होणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर कवडीपाट टोल नाका ते कासुरडी टोल नाका दरम्यान वारंवार होणाऱ्या अपघाताची माहिती पोलिसांना वेळेवर मिळावी यासाठी या महामार्गावर असणाऱ्या प्रत्येक गावांमधून प्रत्येकी चार ते पाच युवकांचा असा कदमवाकवस्ती ते कासुरडी गावच्या युवकांचा एक व्हाट्सएप ग्रुप तय्यार करून त्यांना त्यांच्या परिसरात एखादा अपघात घडल्यास त्याची माहिती त्वरित या व्हाट्सएपच्या ग्रुपवर टाकण्यात येणार आहे.