भोर-महाड मार्गावरील वरंध घाट 'या' तारखेपासून वाहनांसाठी खुला; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 09:10 AM2023-08-24T09:10:30+5:302023-08-24T09:11:10+5:30

हा घाट सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत...

Varandh Ghat on Bhor-Mahad route open for vehicles from 'this' date; Orders of Collectors | भोर-महाड मार्गावरील वरंध घाट 'या' तारखेपासून वाहनांसाठी खुला; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

भोर-महाड मार्गावरील वरंध घाट 'या' तारखेपासून वाहनांसाठी खुला; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

googlenewsNext

पुणे : स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना तसेच उपविभागीय अधिकारी भोर यांचा अहवाल विचारात घेऊन भोर-महाड या मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट २५ ऑगस्टपासून सर्व प्रकारच्या वाहनांसाठी वाहतुकीस खुला करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने अतिवृष्टीबाबत वेळोवेळी दिलेल्या लाल आणि नारंगी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने भोर-महाड मार्गावरील जिल्ह्याच्या हद्दीतील वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद करण्यात आला होता. वाहनांची वाहतूक बंद करून इतर वेळी हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती. आता हवामान खात्याकडून अतिवृष्टीबाबत कोणत्याही प्रकारचे इशारे देण्यात आले नसल्यामुळे वरंधा घाट वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत सुधारित अधिसूचना काढण्यात आली असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Varandh Ghat on Bhor-Mahad route open for vehicles from 'this' date; Orders of Collectors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.