शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडी 'मविआ'चा घटक नाही, प्रकाश आंबेडकर यांची भूमिका

By नितीन चौधरी | Updated: August 30, 2023 18:02 IST

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य...

पुणे :वंचित बहुजन आघाडीची शिवसेनेसोबत युती आहे. मात्र, काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आमचा समझौता नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वंचित आघाडी नाही. इंडिया आघाडीच्या गुरुवारी (दि. ३१) मुंबईत होत असलेल्या बैठकीला निमंत्रण असल्याने आम्ही जाणार नाही,” अशी स्पष्ट भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

कोरेगाव भीमा आयोगाच्या साक्षीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेनेसोबत असलो तरी इंडियाच्या बैठकीसाठी निमंत्रण न आल्यामुळे आम्ही तिकडे जाणार नाही. मात्र, आमची भूमिका शिवसेनेला सांगितली आहे. त्यांच्यासोबत याविषयी चर्चा झाली आहे. आणि आमच्या भूमिकेची वकिली उद्धव ठाकरे इंडियाच्या बैठकीत नक्की करतील, अशी आशा त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

आंबेडकर म्हणाले, “इंडियाच्या बैठकीसाठी आमंत्रण का नाही हे काँग्रेसलाच विचारावे लागेल. २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीने ऑफर दिली होती. यावेळी तशीच ऑफर दिली आहे. मात्र, काँग्रेसकडून कुठलाही प्रतिसाद नाही. इंडियाच्या बैठकीसाठी निमंत्रण का देत नाही, महाविकास आघाडीत का घेत नाही, हे त्यांनाच विचारावे लागेल. याबाबत काँग्रेस ज्या दिवशी आम्हाला सांगेल त्या दिवशी आमंत्रण का नव्हते याबाबत त्यांना विचारू.”

बैठकीनंतर राजकीय भूमिका-

तुम्ही इंडियाच्या बैठकीला जाणार का असे विचारल्यानंतर त्यांनी आमंत्रणच नाही तर आम्ही का जावे असा प्रति सवाल केला. शिवसेनेने स्वतःची भूमिका ठरवावी त्यानंतर बैठकीमध्ये त्यांनी आमच्या बाजूने बॅटिंग करावी असे आम्ही मानतो. यासंदर्भात शिवसेनेची चर्चा झाली आहे. बैठकीत वंचित बहुजन आघाडीची भूमिका लावून धरू, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे. त्यात काय होते, त्यानंतर आपली राजकीय भूमिका ठरवू, असेही आंबेडकर या वेळी म्हणाले.

हे लुटारू सरकार-

केंद्र सरकारने मंगळवारी गॅस सिलेंडरच्या किमतीत दोनशे रुपयांची कपात केल्याबाबत विचारले असता, हे सरकार लुटारू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती कमी झालेल्या नसताना अचानक दरात कपात का केली हे भाजपने आधी सांगावे. येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतील, हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे. त्यासाठीच हे दर कमी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

पंकजांना वेगळ्या भूमिका घेण्यास बळ मिळो-

राष्ट्रवादीतील अजित पवार गट सरकारात सामील झाल्यानंतर हल्ली ते नरेंद्र मोदी यांचे भरभरून कौतुक करत आहेत याबाबत आंबेडकर यांनी, ते ईडीचेच बोलत आहेत, असा टोला लगावला. तर पंकजा मुंडे या सध्या राज्यातील शक्तिस्थळांना भेटी देत आहेत, याविषयी ते म्हणाले त्यांना वेगळी राजकीय भूमिका घेण्याचे बळ ही शक्तीस्थळे देवोत अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी