‘व्हॅलेंटाईन डे’चे लोण ग्रामीण भागातही
By Admin | Updated: February 15, 2017 01:54 IST2017-02-15T01:54:54+5:302017-02-15T01:54:54+5:30
प्रेमाच्या नात्यातील ‘विश्वास’ अन् जवळीक निर्माण करणारा... जीवनात पदोपदी आनंदाची नवी पाऊलवाट फुलविणारा...

‘व्हॅलेंटाईन डे’चे लोण ग्रामीण भागातही
सोमेश्वरनगर : प्रेमाच्या नात्यातील ‘विश्वास’ अन् जवळीक निर्माण करणारा... जीवनात पदोपदी आनंदाची नवी पाऊलवाट फुलविणारा... अशा संदेशाद्वारे भावना व्यक्त करून ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यात आला. आज दिवसभर सोशल मीडियावर भावना व्यक्त करणाऱ्या ‘मेसेज’च्या पोस्ट फिरत होत्या. शहरी भागापर्यंत मर्यादित असणाऱ्या या दिवसाचे लोण ग्रामीण भागापर्यंत पसरले आहे.
युवावर्गाने भेटवस्तू देण्यासाठी दुकानांमधून गर्दी केली होती. ‘व्हॉट्स अॅप’ आणि ‘फेसबुक’च्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात सुरू होती. ग्रीटिंग कार्ड, विविध टेडी, दागिने, बुके, घड्याळे आदी भेटवस्तूंची खरेदी या वेळी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी ग्रामीण भागातील मुलं-मुली संकुचित होत होती. मात्र आता ग्रामीण भागातील ‘व्हॅलेंटाईन डे’ची आज धमाल होती. प्रेमाचा संदेश देण्यासाठी आता ग्रामीण भागातील दुकानेही विविध वस्तंूनी गजबजली होती. ‘आय लव्ह यू’ बोलणारे, ‘मिस यू’ बोलणारे टेडी या टेडींना बाजारांमधून मागणी असल्याचे चित्र होते. ‘आयुष्य किती सुंदर आहे. हे समजून आले... तूच माझ्या जीवनाला प्रथम स्पर्श केलास... अन् मला पे्रमाचा अर्थ कळला, कसं सगळ््या नात्याहून निराळं जगावेगळं... अपूर्वाईनं भरलेलं अन् प्रेमाने फुललेलं आपलं नातं, तुझ्या प्रेमाने माझ्या आयुष्यात एक अतूट दिलासा दिला अशा विविध प्रकारचे लिखाण केलेल्या ‘ग्रीटिंग कार्ड’ला आज मागणी होती. यामध्ये मराठी ग्रीटिंग कार्डला विशेष मागणी दिली. या वर्षी सर्वांत जास्त ग्रीटिंग कार्ड व टेडी या दोन वस्तूंना जादा मागणी असल्याचे सोमेश्वरनगर येथील दुकानदार भारती जगताप यांनी सांगितले.