शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Valentine week : व्हॅलेंटाईन ‘डेज’ ‘सेलिब्रेशन’ मध्ये तरुणाई हरवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 19:22 IST

यंदा जगातील सात आश्चर्य, बोलणारा टेडी, रोझ कॅडबरी, चॉकलेट कपल, टेडीच्या आकाराचे मोठे चॉकलेट आदी भारतीय तसेच तुर्की, इटली, मलेशियन चॉकलेट्सची चांगलीच क्रेझ आहे...

- प्रशांत ननवरे

बारामती (पुणे) : सोमवारी (दि. ७) सुरू झालेल्या मैत्री, ममता, प्रेमाचा संदेश देणाऱ्या रोझ डे पासून विविध ‘डेज’ ‘सेलिब्रेशन’मध्ये सध्या तरुणाईची सर्वत्र धूम आहे. यंदा जगातील सात आश्चर्य, बोलणारा टेडी, रोझ कॅडबरी, चॉकलेट कपल, टेडीच्या आकाराचे मोठे चॉकलेट आदी भारतीय तसेच तुर्की, इटली, मलेशियन चॉकलेट्सची चांगलीच क्रेझ आहे. त्यावर हजारो रुपयांची उधळण करण्यात तरुणाई व्यस्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

‘व्हॅलेंटाईन डे’ सह विविध डेजच्या पार्श्वभूमीवर ‘डे’ज साजरे करण्यात यंदा तरुणांबरोबरच तरुणी देखील मागे नाहीत हे विशेष.आपल्या आवडत्या पार्टनरला जगातील सात आश्चर्य समजल्या जाणाऱ्या परदेशातील ठिकाणी आपण नेऊ शकत नाही; मात्र त्या जागतिक आश्चर्य मानल्या जाणाऱ्या विविध प्रतिकृतींसमोर आपल्या पार्टनर बरोबर नाते गुंफण्यांतच तरुणाई यंदा व्यस्त आहे.यामध्ये बाजारात बुर्ज खलिफा,मिलाद टॉवर,ओरिएंट टॉल टॉवर आदी जागतिक आश्चर्यांच्या प्रतिकृती बाजारात आहेत.त्याला तरुण आणि तरुणींकडून मागणी होत असल्याचे येथील मॅजेस्टिक गिफ्टचे राजेंद्र आहेरकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

याशिवाय गुलाबाचे वेगवेगळे प्रकार, म्युझिकल लाईट, कॉफी मग, कपल मग, गोल्डन, टेडी बुके, संगीतावर लयबद्ध होणारे गुलाब, टेडी, कलर म्युझिकल पिलो, कपल टेडी, गिफ्ट बॉक्सेस, काचेचा गोल, चौकानी आणि आयताकृती काचेमध्ये नाचणारे स्वच्छंदी जोडपे, बर्फात बसलेले प्रपोज करणारे ‘डान्सिंग कपल’तसेच ‘आय लव्ह यू’ आणि ‘आय मिस यू’ बोलणारा टेडी, लीप्सच्या आकाराचे टेडी चांगलेच भाव खात आहेत. टेडी डे ला म्युझिकल कपल, पांडा, युनिकॉर्न, ऑक्टोपस टेडीला मोठी मागणी आहे.

किस डे निमित्त लिप्स चॉकलेट, लीप्स सॉफ्ट टॉईज, गिटार, पियानो, आलिंगन दिलेला शो पीस, मोठे शो पीस, परफ्यूम, वॉलेट, वॉचेस, ब्रेसलेट, पेडंट, डिओ, प्रेमाचा संदेश देणारी सुगंधी, रंगीत मेणबत्ती, सेव्हन बॉटल, डॉल्स, कृत्रिम फुले, हातातील ब्रेसलेट, कपल रींग, शो पीस, मिनियन कार्टुन, टेडी चॉकलेट,डान्सिंग टेडी, व्हिजिट बॉक्स, मॅग्नेटिक टेडी, क्रिस्टल किचन, लेडिज वॉलेट, शोपीस, पेअर टेडी,हार्ट,सोनेरी मखमली आवरण असणारे चॉकलेट, चॉकलेट बुके, टेडी,रोझ आदी बाजारात असल्याचे राजेंद्र आहेरकर यांनी सांगितले.

...‘डे’ज च्या शेवटी ‘ब्रेकअप’ ‘डे’

७ फेब्रुवारीला ‘रोज डे’,८ ला प्रपोज,९ चॉकलेट,१० टेडी,११ प्रॉमिस,१२ किस,१३ ‘हग’,१४ व्हॅलेंटाईन,तर १५ ला स्लॅप डे,१६ किक डे,१७ परफ्युम ,१८ फ्लर्टींग,१९ ला कन्फ्युजन,२० ला मिसिंग,तर २१ फेब्रुवारीला चक्क ‘ब्रेकअप’ डे आहे. त्यामुळे ७ तारखेला प्रेमाचे मैत्रीचे नाते गुुंफण्याचा सुरू झालेला काहीजणांचा प्रवास शेवटच्या दिवशी थांबण्याची देखील संधी आहे. वेगवेगळ्या ‘डे’ज चा पंधरवडा ‘ब्रेकअप’ डे ला समाप्त होणार आहे.

...सारं जग नवं-नवं वाटू लागतं

प्रेमासह विविध ऋणानुबंध निर्माण करण्यासाठी ‘ग्रीटिंग’ ला एकेकाळी चांगलीच मागणी असते. यंदा थेट व्हॅलेंटाईन चा संदेश देणारी ग्रीटिंग बाजारात आहेत. एकदा प्रेमात पडल्यावर सारं जगच नवं नवं वाटू लागतं...मनाचे अंतरंग नव्याने फुलू लागतं. सारं काही वेगळंच भासू लागतं. प्रेम म्हणजे उत्तरांना पडलेले गोड गोड प्रश्न. प्रेमाची एक फुंकर...तुझी आठवण हाच आहे माझ्या जीवनातील एक अनमोल क्षण...ग्रीटिंगच्या आदी संदेशांनी प्रेमवीरांचे लक्ष वेधले आहे; मात्र सोशल मीडियाच्या काळात ‘हायटेक’ यंत्रणांमुळे ग्रीटिंगचा पर्याय काहीसा मागे पडल्याचे दिसून येते.

टॅग्स :PuneपुणेValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे