शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

१ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणाऱ्या वकिलास धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 01:13 IST

पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणा-या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे.

पुणे : पर्वती येथील जागेबाबत त्यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी १ कोटी ७० लाख रुपयांच्या लाचेची तक्रार देणा-या वकिलाला रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी सराईत गुन्हेगार ऋषीकेश बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला असून, जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे; तसेच यात मध्यस्थी करणारा अ‍ॅड़ उमेश शेंडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ कोटी ७० हजार रुपयांची लाच स्वीकारताना गेल्या वर्षी डिसेंबरअखेरीस अटक केली होती़.याबाबत पोलिसांनी सांगितले की, अ‍ॅड़ उमेश चंद्रशेखर मोरे (रा़ बालाजीनगर, धनकवडी) यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची तक्रार दिली होती़ त्यानुसार अ‍ॅड. शेंडे याच्यावर कारवाई करण्यात आली़ त्यानंतर आरोपी ऋषीकेश बारटक्के यांनी मोरे यांच्याशी संपर्क साधून तक्रारीबाबत चौकशी केली़ ही जागा सध्या आमच्या ताब्यात आहे़ या जागेचा निकाल त्यांच्याविरुद्ध गेल्याने ऋषीकेश बारटक्के व शहा यांना राग आला होता़२७ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी साडेबारा वाजता ते सेंट्रल बिल्डिंग येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आले होते़ तेथून परत जात असताना मोरे यांना बारटक्के याने रस्त्यात अडवून तक्रार का दिली, असे विचारून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली; तसेच त्यांना हाताने मारहाण केली. या प्रकाराने मोरे हे घाबरून गेले होते़ चार-पाच दिवस ही बाब कोणाला सांगितली नाही़ त्यानंतर त्यांनी भीतीपोटी २ जानेवारी रोजी बंडगार्डन पोलिसांकडे अर्धवट तक्रार केली होती़.या अर्जाची तपासणी केल्यानंतर बुधवारी बारटक्के व शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे हे अधिक तपास करीत आहेत.