किरण शिंदे
पुणे : वैष्णवीच्या मृत्युंनंतर वैष्णवीचे नऊ महिन्यांचे बाळ हे आईपासून पोरके झाले आहे. मात्र आईच्या मृत्युंनंतर ते बाळ कुठे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र याबाबत वैष्णवीच्या मामानी एका धक्कादायक माहिती दिली आहे. वैष्णवीचे बाळ हे निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीकडे असल्याचा दावा तिच्या मामाने केला आहे. मात्र पोलिसांकडून संबंधित व्यक्तीला अटक कारण्याऐवजी कस्पटे कुटुंबंला उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
निलेश चव्हाण हा वैष्णवीचा पती शशांक हगवणे याचा बिजनेस पार्टनर असल्याची माहिती समोर येत असून पुण्यातील कर्वेनगर भागातील औदुंबर सोसायटीत चव्हाण राहायला आहे. वैष्णवीच्या मृत्युंनंतर तिच्या बाळात आपल्या मुलीला बघणाऱ्या कस्पटे कुटुंबंला बाळाचा ताबा भेटत नाही. इतकेच नाही तर ज्यावेळी आम्ही बाळ आणायला गेलो तर तिथे चव्हाण याने आम्हला बंधूकीचा धाक दाखवून तुमचा आणि बाळाचा काही संबंध नाही, बाळाचा ताबा हवा असेल तर कोर्टात जा असे म्हणून त्याने बंदूक दाखवल्याने आम्ही तिथून निघून आलो असे मामाने सांगितले आहे.
जय प्रकाश हगवणे हे राजेंद्र हगवणे यांचे मोठे बंधू असून ते आमच्या सोबत असून बाळ जिथे आहे तिथे खूप रडत आहे. आम्हाला राहवलं नाही म्हणून आम्ही तिथे गेलो तर आम्हाला बंदूक दाखवून हाकलून दिले. त्यामुळे मुलाच्या आईचा जीव तर गेलाचा आहे, मात्र त्या नऊ महिन्याच्या बाळाच्या जीवाला धोका असल्याचे मामांकडून सांगण्यात आले. ज्यावेळी आम्ही या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली त्यावेळी पोलिसांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. उद्या जर मुलाच्या आईसारखे त्या बाळच्या जीवाला काही बर वाईट झाल तर याला जबाबदार कोण असा सवाल मुलीच्या मामानी उपस्थित केला आहे.