किरण शिंदे
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार होते. मात्र, पुणे पोलिसांनी शुक्रवारी पहाटे दोघांनाही अटक केली असून, अटकेपूर्वी त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हे दोघे तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मस्तपैकी मटणावर ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे आरोपी फरार असतानाही मोकाटपणे फिरत होते, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.
वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी पती, सासू, नणंद, सासरा आणि दीर यांनी मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे, जमीन खरेदीसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा छळ सुरू झाला होता, असेही कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
Breaking: वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक; दीरही पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
या प्रकरणात पोलिसांनी आधीच पती, सासू आणि नणंद यांना अटक केली होती. मात्र, सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे गेल्या सात दिवसांपासून फरार होते. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ४:३० च्या सुमारास पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात हे दोघे अखेर जेरबंद झाले.
अटकपूर्वीचा या दोघांचा जेवणाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. आरोपींनी फरारी काळात आरामात हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेतल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. सध्या दोघांची कसून चौकशी सुरू असून, वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार ठरवून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
सासरा, दीर पोलिसांच्या जाळ्यात, पहाटे कारवाई
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.