शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी प्रकरण: नीलेशच्या घरातून तीन मोबाइल, पिस्तूल जप्त; पासपोर्ट, शस्त्र परवानाही सापडला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 06:35 IST

रुखवतासाठी १ लाखाचा चेक अन् ५० हजार घेतले

लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात शनिवारी पोलिस कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या बावधन पोलिसांनी नीलेश चव्हाणला त्याच्या पुण्यातील कर्वेनगर येथील घरी नेऊन तपास केला. तेथून तीन मोबाइल फोन, शस्त्र परवाना, पिस्तूल, पासपोर्ट जप्त करण्यात आले.

नीलेशची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे. शनिवारी त्याला त्याच्या घरी नेण्यात आले. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे या तिघांचे मोबाइल फोन नीलेशच्या घरात मिळून आले. ते पोलिसांनी जप्त केले. घरातून नीलेशचे पारपत्र (पासपोर्ट), शस्त्र परवाना आणि पिस्तूलही जप्त केले.

रुखवतासाठी १ लाखाचा चेक अन् ५० हजार घेतले

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर आणखी एक आरोप केला आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेण्यात आले, असा दावा त्यांनी समाजमाध्यमावर केला. पोस्टसोबतच दमानिया यांनी बँक स्टेटमेंटचा फोटोही पोस्ट केला आहे. दरम्यान, वैष्णवीचा पती शशांक याला शस्त्र पुरविण्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर  सुपेकर यांची शुक्रवारी मुंबईत होम गार्डच्या उपमहासमावेशकपदी बदली करण्यात आली आहे.

काय म्हणाल्या दमानिया?

दमानिया यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले, ''हा घ्या एक मोठा पुरावा...वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या महेच्यांकडून वसूल केले.’’

नीलेश चव्हाणकडून यापूर्वी तीन मोबाइल जप्त केले. शनिवारी आणखी त्याच्या घरातून तीन फोन जप्त केले. जप्त मोबाइल फाॅरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत. -अनिल विभुते, व. पो. निरीक्षक, बावधन

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPune Crimeपुणे क्राईम बातम्या