खेबूडकरांमुळे मराठीला वैभव

By Admin | Updated: May 9, 2017 04:12 IST2017-05-09T04:12:18+5:302017-05-09T04:12:18+5:30

जगदीश खेबूडकरांनी विपरित परिस्थितीवर मात करून स्वत:च्या प्रतिभेने मराठीला वैभव प्राप्त करून दिले. जनमानसात न पोहोचलेली

Vaibhav in Marathi due to Khebudkar | खेबूडकरांमुळे मराठीला वैभव

खेबूडकरांमुळे मराठीला वैभव

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जगदीश खेबूडकरांनी विपरित परिस्थितीवर मात करून स्वत:च्या प्रतिभेने मराठीला वैभव प्राप्त करून दिले. जनमानसात न पोहोचलेली त्यांची अप्रकाशित पुस्तके प्रकाशित करून शब्दप्रभू जगदीश खेबूडकर प्रतिष्ठानने मोलाचे कार्य केले आहे, असे गौरवोद्गार आमदार मेधा कुलकर्णी यांनी काढले.
नेहरू युवा केंद्र, पुणे युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, शब्दप्रभू जगदीश खेबूडकर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा चेंबर आॅफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात आयोजित जगदीश खेबूडकरांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून कुलकर्णी बोलत होत्या.
याप्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. याकूब सईद, प्रतिष्ठानचे अध्यक्ष यशवंत मानखेडकर, दूरदर्शनचे माजी संचालक भगवंतराव इंगळे, माजी जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.
मानसी आपटे यांनी सूत्रसंचालन केले. अंगाई खेबूडकर-महाजनी यांनी आभार मानले.

Web Title: Vaibhav in Marathi due to Khebudkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.