महापालिकेच्या १९७ केंद्रांवर लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:10 IST2021-07-15T04:10:21+5:302021-07-15T04:10:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या एकूण १९७ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण केले जाणार आहे. १९१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध ...

Vaccines available at 197 NMC centers | महापालिकेच्या १९७ केंद्रांवर लस उपलब्ध

महापालिकेच्या १९७ केंद्रांवर लस उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या एकूण १९७ केंद्रांवर गुरुवारी लसीकरण केले जाणार आहे. १९१ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून, या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १९१ लसीकरण केंद्रांवर उपलब्ध कोविशिल्ड लसींच्या साठ्यापैकी ४० टक्के लस ऑनलाईन अपॉईन्मेंट /स्लॉट बुक केलेल्या १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर, २० टक्के ऑन द स्पॉट दिल्या जाणार आहेत. यासोबतच २० टक्के लस २१ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या आणि ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहेत. तर, २० टक्के लस जागेवर देण्यात येणार आहेत.

-----

१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना सहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. यातील २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या तर २० टक्के लस ऑन द स्पॉट बुकिंग करून दिली जाणार आहे. यातील ४० टक्के लस १६ जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे.

Web Title: Vaccines available at 197 NMC centers