महापालिकेच्या १९७ केंद्रांवर लस उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:11 IST2021-07-07T04:11:39+5:302021-07-07T04:11:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या १९७ केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८२ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार ...

Vaccines available at 197 NMC centers | महापालिकेच्या १९७ केंद्रांवर लस उपलब्ध

महापालिकेच्या १९७ केंद्रांवर लस उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या १९७ केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८२ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून, या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर, ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.

पालिकेने दिलेल्या माहितीनुसार: लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेल्या साठ्यापैकी ५० टक्के कोविशिल्ड लस ही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर, ५० टक्के लस ही ४५ वर्षांपुढील नागरिकांना (१३ एप्रिल पूर्वी पहिला डोस झालेले) दुसऱ्या डोससाठी दिली जाणार आहे. लसीकरणाचे बुकिंग करण्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे.

-----

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस

शहरातील १८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना कोव्हॅक्सिन लस सहा केंद्रांवर उपलब्ध राहणार आहे. उपलब्ध साठ्यातील पहिल्या डोससाठी २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या आणि २० टक्के लस ही ऑन द स्पॉट देण्यात येणार आहे. तर, ४० टक्के लस ही १८ वर्षांपुढील ज्या नागरिकांनी ७ जूनपूर्वी पहिला डोस घेतला आहे अशा नागरिकांना दिली जाणार आहे. तर, २० टक्के लस ऑन द स्पॉट नोंदणी करून दिली जाणार आहे. गरोदर स्त्रिया आणि दिव्यांग व्यक्तींना ऑन द स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने लस दिली जाणार आहे.

Web Title: Vaccines available at 197 NMC centers