महापालिकेच्या १९० केंद्रांवर लस उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:09 IST2021-07-10T04:09:47+5:302021-07-10T04:09:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या एकूण १९० केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८४ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध ...

महापालिकेच्या १९० केंद्रांवर लस उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या एकूण १९० केंद्रांवर शनिवारी लसीकरण केले जाणार आहे. १८४ केंद्रांवर कोविशिल्ड लस उपलब्ध राहणार असून या केंद्रांवर १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे. तर ६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस उपलब्ध असणार आहे.
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, १८४ लसीकरण केंद्रावर उपलब्ध कोविशिल्ड लसींच्या साठ्यापैकी ४० टक्के लस आॅनलाईन अपॉईमेंट /स्लॉट बुक केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिल्या जाणार आहेत. तर, २० टक्के ऑन द स्पॉट दिल्या जाणार आहेत. यासोबतच २० टक्के लस १६ एप्रिलपूर्वी पहिला डोस घेतलेल्या आणि ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार आहेत. तर, २० टक्के लस जागेवर देण्यात येणार आहेत.
-----
१८ वर्षांपुढील सर्व नागरिकांना सहा केंद्रांवर कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. यातील २० टक्के लस ऑनलाईन बुकिंग केलेल्या तर २० टक्के लस ऑन द स्पॉट बुकिंग करून दिली जाणार आहे. यातील ४० टक्के लस ११ जुनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना ऑनलाईन बुकिंगद्वारे तर २० टक्के लस ऑन द स्पॉट दिली जाणार आहे.