परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:09 IST2021-05-30T04:09:57+5:302021-05-30T04:09:57+5:30

पुणे : शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना ...

Vaccination for students going abroad for education | परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लसीकरण

पुणे : शिक्षणासाठी परदेशात जात असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी या मोहिमेची सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश परदेशात निश्चित झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या दिलासा म्हणून ही लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. याबाबत महापौर मोहोळ म्हणाले, “पुणे पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील लसीकरण केंद्रात ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. नोंदणी न करता थेट ‘वॉक इन’ पध्दतीने परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. यासाठी मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. सकाळी १० ते ५ या वेळेत विद्यार्थी-विद्यार्थिनींना लस उपलब्ध होणार आहे.”

लसीकरणावेळी विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आणि प्रवेश निश्चित झाल्याचे पुरावे सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढली तर ही मोहीम संपूर्ण आठवडाभर राबविण्याची तयारी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गर्दी करु नये. विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा आणि लसीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन महापौरांनी केले.

Web Title: Vaccination for students going abroad for education