पुरंदरमधील तीन उपकेंद्रांमध्ये लसीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:09 IST2021-04-03T04:09:55+5:302021-04-03T04:09:55+5:30
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात माळशिरससह २२ गावांचा समावेश आहे. माळशिरस आरोग्य केंद्रात माळशिरस, ...

पुरंदरमधील तीन उपकेंद्रांमध्ये लसीकरण सुरू
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात असणाऱ्या माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात माळशिरससह २२ गावांचा समावेश आहे. माळशिरस आरोग्य केंद्रात माळशिरस, पोंढेपासून ते सासवड, दिवे गावापर्यंत परिसरातील गावे व सासवड सुपा रोड वरील राजुरी,रिसे,पिसे पासून पारगाव पर्यंत मोठ्या लोकसंख्येचे गाव असल्याने सर्वांना लसीकरणासाठी माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात यावे लागते. यामुळे या ठिकाणी गर्दी पहायला मिळते. नागरिकांच्या सोयीनुसार उपकेंद्राच्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करणे गरजेचे होते. उपकेंद्राच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीची देखील अशी मागणी होती. त्यानुसार शुक्रवारी पिसर्वे येथे सरपंच बाळासाहेब कोलते व पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपसरपंच अरुणा कोलते, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत कोलते, उद्योगपती गणेश कोलते, नितीन वायकर ,मच्छिंद्र आबा कोलते आदी उपस्थित होते.
वाघापूर व दिवे येथे देखील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यामुळे माळशिरस गावातील लसीकरणासाठी बाहेरून येणारी गर्दी कमी होण्याबरोबरच नागरिकांना देखील लसीकरणाची नजीक सोय उपलब्ध होणार असल्याची माहिती माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने देण्यात आली .
०२ भुलेश्वर
पिसर्वे येथे लसीकरण केंद्र सुरू करताना बाळासाहेब कोलते, सुनीता कोलते व इतर.