मांजरेवाडी आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:09 IST2021-04-11T04:09:52+5:302021-04-11T04:09:52+5:30
मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी, मांजरेवाडी (धर्म) या परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आरोग्य खात्याच्या समन्वयातून ...

मांजरेवाडी आरोग्य केंद्रात लसीकरणाला सुरुवात
मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी, मांजरेवाडी (धर्म) या परिसरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आरोग्य खात्याच्या समन्वयातून गावात लसीकरण घेण्यात आले. यासाठी सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यातुनच मांजरेवाडी येथे शनिवारी, दि.१० ग्रामस्तरावरील लसीकरणास सुरूवात झाली. या लसीकरण शिबिराचे उद्घाटन सरपंच अनिता मांजरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपसरपंच सुमन मांजरे, माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सुरेखा मलघे, गणेश मांजरे, सतीश मलघे, मयूरी मांजरे, शरद मांजरे, युवा उद्योजक विलास मांजरे, पोलिस पाटील युवराज मांजरे,विष्णू मेदगे, भगवान मलघे, मनोहर मांजरे, बाळासाहेब मांजरे, ग्रामसेवक जहागिर सैय्यद व ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य विभागाने मांजरेवाडी ग्रामपंचायतला दिलेले लसीकरणाचे डोस पुरेसे नाही. मांजरेवाडी (पिंपळ), मांजरेवाडी (धर्म ), मलघेवाडी या तीन गावातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या पाहता अजून लसीकरणाचे डोस आरोग्य विभागाने उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी यावेळी सरपंच अनिता मांजरे व ग्रामस्थांनी यावेळी केली.
१० दावडी
मांजरेवाडी (ता. खेड) येथे कोरोना प्रतिबंध लस नागरिकांना देण्यात आली.