घोडेगाव परिसरात लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:11 IST2021-03-06T04:11:42+5:302021-03-06T04:11:42+5:30
यावेळी दादू जाधव, माजी सभापती कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, विद्यमान उपसभापती संतोष भोर, जयसिंगराव काळे, किरण घोडेकर, माजी सरपंच ...

घोडेगाव परिसरात लसीकरणाला सुरुवात
यावेळी दादू जाधव, माजी सभापती कैलासबुवा काळे, सखाराम घोडेकर, विद्यमान उपसभापती संतोष भोर, जयसिंगराव काळे, किरण घोडेकर, माजी सरपंच रूपाली झोडगे, सुनील इंदोरे, स्वप्निल घोडेकर आदी उपस्थित होते.
६० वर्षांवरील नागरिक तसेच ४५ ते ५९ वयोगटातील नागरिक, सरकारने निर्धारित केलेल्या २० आजारांपैकी कोणताही आजार असल्यास ऑनलाइन नोंदणी करू शकतात. लसीकरणाला जाताना आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, चालक परवाना, पॅनकार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, पेन्शन कागदपत्र, बॅक-पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉबकार्ड, खासदार, आमदार, एमएलसी आयडी कार्ड, सरकारी कर्मचा-यांचे सर्व्हिस आयडी कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत जारी करण्यात आलेलं स्मार्टकार्ड यापैकी कोणतेही एक ओळखपत्र घेऊन जावे. जर गंभीर आजार असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत घेऊन जावे, असे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले.
०५ घोडेगाव
घोडेगाव येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरणात लस घेताना माजी सभापती सखाराम घोडेकर.