वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST2021-07-17T04:10:53+5:302021-07-17T04:10:53+5:30

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ नळस्टाॅप विभागप्रमुख, सामाजिक कार्येकर्ते सुनील म्होकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पौड फाटा येथील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी ...

Vaccination of newspaper vendors | वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण

वृत्तपत्र विक्रेत्यांचे लसीकरण

पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ नळस्टाॅप विभागप्रमुख, सामाजिक कार्येकर्ते सुनील म्होकर यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून पौड फाटा येथील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी लसीकरण शिबिर आयोजित केले होते. बाल तरुण मंडळ, श्री ज्ञानदेव सेवा ट्रस्ट व महापालिकेच्या माध्यमातून १६५ जणांचे लसीकरण केले. तसेच मास्क, आयुर्वेद काढा वाटप करण्यात आले.

सुनिल म्होकर यांनी सर्व मंडाळाना संदेश दिला आहे की वाढदिवस साजरे न करता लसीकरनाचे ऊपक्रम आपआपल्या भागात राबवा.

याप्रंसगी पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे, वरिष्ठ उपाध्यक्ष दत्तात्रय पिसे, सचिव अरुण निवंगुणे, हभप ऋषिकेश महाराज चोरगे तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक सदस्य मंकरण ढवळे, विभागप्रमुख बाळासाहेब पानगावाकर, कैलास नाकते, पंडीत म्होकर, सचिन मुंगारे, बाळासाहेब म्होकर, रमेश पायगुडे, दीपक सांवत, नवनाथ म्होकर, शुभम माताळे उपस्थित होते.

Web Title: Vaccination of newspaper vendors