आंबेगावात लसीकरणाला आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:10 IST2021-04-10T04:10:24+5:302021-04-10T04:10:24+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लसीकरण हा एक प्रभावी उपाय असून तालुक्यात लसीकरणाला वेग दिला जात आहे. मंचर उपजिल्हा ...

Vaccination has gained momentum in Ambegaon | आंबेगावात लसीकरणाला आला वेग

आंबेगावात लसीकरणाला आला वेग

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. लसीकरण हा एक प्रभावी उपाय असून तालुक्यात लसीकरणाला वेग दिला जात आहे. मंचर उपजिल्हा रुग्णालय, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय,प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण केले जात असून आता गावोगावी लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग येथे दोन दिवस कोरोना लसीकरण करण्यात आले. लसीकरण मोहिमेचा शुभारंभ खरेदी-विक्री संघाचे संचालक मारुती डोके, श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे,माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे येऊन लसीकरणात सहभाग नोंदविला. आरोग्य सेविका अर्चना निंबाळकर,डॉ. नीलम घोडके, डॉ. पूजा बहिर, डॉ. संतोष पबलकर, आरती पिंगळे आदींनी लसीकरणाची व्यवस्था पाहिली. नागरिकांनी लसीकरण केले तरी मास्क लावणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे या बाबी प्राधान्याने कराव्यात असे आवाहन श्रीकृष्ण पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब पिंगळे यांनी यावेळी केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग व ग्रामस्थांनी ही लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवली. फोटोखाली: वडगाव काशिंबेग येथे कोरोना लसीकरणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Web Title: Vaccination has gained momentum in Ambegaon