योगभवन पाषाण येथे लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:09 IST2021-04-19T04:09:51+5:302021-04-19T04:09:51+5:30
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सुमारे चार लाखांहून अधिक पुणेकरांनी लस ...

योगभवन पाषाण येथे लसीकरण केंद्र सुरू
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. सुमारे चार लाखांहून अधिक पुणेकरांनी लस घेतली असून ती सुरक्षित आहे. यामुळे कोरोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे यावेळी सांगितले.
यावेळी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार, आबासाहेब सुतार, सुरेश कोकाटे, अंबादास कोकाटे, सचिन पाषाणकर , उत्तम जाधव, रोहन कोकाटे, आकाश पवार, प्रज्वल कोकाटे, विशाल लांगी, सहाय्यक आयुक्त जयदीप पवार, डाॅ. गणेश डमाले, केंद्रप्रमुख डाॅ. पल्लवी खिरडकर, निखिल निकम उपस्थित होते.
स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांनी पाठपुरावा करून आदिशक्ती योग भवन येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. सुसरोड सुतारवाडी शिवनगर आदी परिसरातील नागरिकांना यामुळे लसीकरण करणे सुलभ होणार आहे.
फोटो - योग भवन