लस घेण्यापूर्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:10 IST2021-04-25T04:10:17+5:302021-04-25T04:10:17+5:30

बारामती: येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे लसीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान ...

Before vaccination | लस घेण्यापूर्वी

लस घेण्यापूर्वी

बारामती: येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध होणार आहे, त्यामुळे लसीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँकेचे सचिव डॉ. अशोक दोशी यांनी केले आहे.

डॉ. दोशी म्हणाले की, लसीचा शेवटचा डोस घेतल्यानंतर पुढील २८ दिवस रक्तदान करता येणार नाही, त्यामुळे रक्तदान करण्याकडे रक्तदात्यांचा कल कमी झाल्यास रक्ताचा तुटवडा निर्माण होईल त्यामुळे लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच आपल्या बारामती आणि परिसरात कोरोना रुग्ण संख्या वाढल्याने संचारबंदी आहे, त्यामुळे पुरेशा प्रमाणात रक्तदान शिबिरे होत नाहीत त्यातच लस घेतल्यास २८ दिवस रक्तदान करता येणार नाही या कारणाने येत्या मे आणि जून या कालावधीत रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला तर गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे अशक्य होईल त्यामुळे शक्यतो लस घेण्यापूर्वी रक्तदान करण्याचे आवाहन डॉ. दोशी यांनी केले आहे.

सध्या बारामती आणि परिसरात कोरोना आणि इतर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना रक्ताची मागणी होत आहे कोरोनाबरोबरच रक्तदाब, अशक्तपणा, हृदयरोग, किडनीचे आजार याबरोबरच बाळंतपण यासाठी देखील रक्ताची मागणी होत आहे या कारणास्तव रक्त आणि रक्तघटकांची मागणी होत आहे म्हणून येत्या काळात इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन दोशी यांनी केले आहे.

Web Title: Before vaccination